"मंत्र्याचा पीए बोलतोय, तुम्हाला दान करण्याची संधी मिळालीय"; महिलेला 46 हजारांचा गंडा
By ऑनलाइन लोकमत | Published: November 2, 2023 10:29 AM2023-11-02T10:29:47+5:302023-11-02T10:38:16+5:30
गेल्या महिन्यात हॉस्पिटलच्या मालकिणीला एक फोन आला होता. फोन करणार्याने तो ओडिशा सरकारमधील कृषी आणि शेतकरी सक्षमीकरण मंत्री रणेंद्र प्रताप स्वॅन यांचा पीए असल्याचं सांगितलं.
ओडिशा सरकारचे मंत्री रणेंद्र प्रताप स्वॅन यांच्या नावाने फसवणूक केल्याची घटना समोर आली आहे. आरोपी ट्रान्सजेंडर आहे. त्याने हॉस्पिटलच्या मालकिणीला मंत्र्यांचा पीए असल्याचं सांगून हवन-पूजेच्या नावाखाली 46 हजार रुपयांची देणगी मागितली. नंतर सत्य समोर आल्यावर रुग्णालय व्यवस्थापनाला मोठा धक्का बसला. याप्रकरणी पोलिसात तक्रार करण्यात आली. आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे. त्याने यापूर्वीही लोकांची फसवणूक केली आहे. प्रकरण कटक जिल्ह्यातील आहे.
सायबर क्राईम पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गेल्या महिन्यात हॉस्पिटलच्या मालकिणीला एक फोन आला होता. फोन करणार्याने तो ओडिशा सरकारमधील कृषी आणि शेतकरी सक्षमीकरण मंत्री रणेंद्र प्रताप स्वॅन यांचा पीए असल्याचं सांगितलं. त्याने मंत्र्याच्या आवाजात बोलून खासगी रुग्णालयाच्या मालकिणीची फसवणूक केली. आरोपीला मंगळवारी अटक करण्यात आली आहे.
रुग्णालयाच्या मालकिणीला वाटलं की मंत्री एखाद्या रुग्णाबाबत काहीतरी महत्त्वाचं बोलण्याचा प्रयत्न करीत आहेत, म्हणून तिने तिच्या वैयक्तिक मोबाइल नंबरवरून परत कॉल केला. एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने सांगितलं की, आरोपी हॉस्पिटलच्या मालकिणीशी मंत्र्याच्या आवाजात बोलला आणि सांगितलं की माँ सिबनी दुर्गा नावाच्या धार्मिक व्यक्तीला हॉस्पिटलमध्ये यायचं आहे. पूज्य माताजींच्या हवनात दान करण्याची संधी मिळाली आहे.
“UPI द्वारे 46500 रुपये पाठवले”
फोन करत असताना आरोपीने दुर्गाला फोनही दिला. महिलेने सांगितले की ती हवन करण्याचे आयोजन करत असून तिला 31 किलो तुपाची गरज आहे, त्यासाठी सुमारे 46 हजार रुपयांची आवश्यकता आहे. फसवणूक करणाऱ्याने यूपीएचा नंबरही शेअर केला होता. मालकिण खूप व्यस्त असल्याने तिने बँक खात्यातून संबंधित यूपीआय नंबरवर 46,500 रुपये पाठवले. नंतर जेव्हा सत्य समजले तेव्हा धक्काच बसला. मंत्री किंवा त्यांच्या पीएचा कोणताही फोन आला नसून त्यांची फसवणूक झाल्याचे तपासात समोर आले आहे. परत कॉल केला तेव्हा नंबर बंद होता.
“मंत्र्याला भेटलो आणि कसं बोलतात ते समजलं”
तपासादरम्यान आरोपीने दोन वर्षांपूर्वी दिल्लीला जाऊन तेथे काम करण्याची पद्धत अवलंबल्याचे उघड झालं. पोलीस सूत्रांचे म्हणणे आहे की, आरोपी दिल्लीहून ओडिशात परतला आणि देणगी मागण्यासाठी कृषीमंत्र्यांच्या कार्यालयात गेला होता. तेथे मंत्री नेमकं कसे बोलतात हे कळलं.
"आतापर्यंत 10 लाखांची फसवणूक केली"
काही दिवसांनंतर आरोपींनी काही अज्ञात लोकांचे मोबाईल क्रमांक आणि बँक खाती गोळा करून त्यांचे क्रमांक इंटरनेटवरून घेतले. त्यानंतर खासगी रुग्णालये, हॉटेल्स, रेस्टॉरंटच्या मालकांना फोन करण्यास सुरुवात केली. पोलिसांनी सांगितले की, गेल्या दोन वर्षांत आरोपींनी 100 हून अधिक लोकांची 10 लाख रुपयांची फसवणूक केली.