"मी प्रेग्नेंट आहे..." ऐकताच युवकाला बसला धक्का; मृत्यूपूर्वी गर्लफ्रेंडला पाठवला सेल्फी

By ऑनलाइन लोकमत | Published: November 30, 2022 05:36 PM2022-11-30T17:36:58+5:302022-11-30T17:37:15+5:30

या घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहचले. त्यानंतर पोलिसांनी घराचा दरवाजा तोडून आतमध्ये प्रवेश केला.

"I am pregnant..." The youth was shocked to hear; Selfie sent to girlfriend before death | "मी प्रेग्नेंट आहे..." ऐकताच युवकाला बसला धक्का; मृत्यूपूर्वी गर्लफ्रेंडला पाठवला सेल्फी

"मी प्रेग्नेंट आहे..." ऐकताच युवकाला बसला धक्का; मृत्यूपूर्वी गर्लफ्रेंडला पाठवला सेल्फी

Next

रिवा - मध्य प्रदेशातील रिवा जिल्ह्यात आत्महत्येचा खळबळजनक प्रकार समोर आला आहे. गर्लफ्रेंड प्रेग्नेंट आहे समजताच युवकाने हा टोकाचा निर्णय घेतला. आत्महत्येपूर्वी युवकाने त्याच्या गर्लफ्रेंडसोबत संवाद साधला होता. त्यावेळी गर्लफ्रेंडनं मी प्रेग्नेंट आहे असं सांगताच युवकाला मोठा धक्का बसला. त्यानंतर युवकानं गर्लफ्रेंडला सेल्फी पाठवून गळफास घेत आत्महत्या केली. सध्या पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत. 

रिवा जिल्ह्यातील संजय नगर भागातील ही घटना आहे. मिळालेल्या माहितीनुसार, २९ वर्षीय विनय कुमार द्विवेदी संजय नगर भागात भाड्याने घर घेऊन राहत होता. सोमवारी रात्री उशिरा विनयनं त्याच्या खोलीत गळफास घेत आत्महत्या केली. मंगळवारी सकाळी जेव्हा विनय खोलीतून बाहेर आला नाही. तेव्हा घरमालकाला संशय आला. त्याने याबाबत तातडीने पोलिसांना फोन करून कळवलं. 

दरवाजा तोडून पोलीस घरात शिरले
या घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहचले. त्यानंतर पोलिसांनी घराचा दरवाजा तोडून आतमध्ये प्रवेश केला. तेव्हा समोरील दृश्य पाहून त्यांना धक्का बसला. विनयचा मृतदेह पंख्याला लटकलेल्या अवस्थेत होता. तर त्याचा मोबाईल बेडवर पडला होता. तपासावेळी विनयने जीव देण्यापूर्वी त्याच्या गर्लफ्रेंडशी संवाद साधल्याचं उघड झाले. त्याचसोबत सुसाईड करतानाचा फोटोही तिला पाठवला होता. 

विनयची गर्लफ्रेंड प्रेग्नेंट होती. जेव्हा ही गोष्ट विनयला समजली तेव्हा त्याला शॉक बसला. या धक्क्यातून सावरता न आल्याने विनयनं हे टोकाचं पाऊल उचललं. सध्या पोलिसांनी विनयचा फोन जप्त केला असून त्याचा मृतदेह पोस्टमोर्टमसाठी पाठवला आहे. पोलिसांनी विनयच्या नातेवाईकांनाही कळवले आहे. घटनेची माहिती मिळाल्यानंतर कुटुंबियांनी घटनास्थळी धाव घेतली. नातेवाईकांनी सांगितल्यानुसार, विनय हा विद्युत विभागात सब स्टेशनला मेंटेनसचं काम करायचा. घटनेपूर्वी त्याचे कुटुंबासोबत बोलणं झाले होते. परंतु त्याला कुठलाही त्रास आहे असं त्याच्या बोलण्यातून वाटलं नाही असं नातेवाईकानी पोलिसांना सांगितले.

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम" 

Web Title: "I am pregnant..." The youth was shocked to hear; Selfie sent to girlfriend before death

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.