'I am sorry...' आईला अखेरचा मेसेज; स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या मुलानं संपवलं आयुष्य
By ऑनलाइन लोकमत | Published: August 10, 2023 09:14 AM2023-08-10T09:14:58+5:302023-08-10T09:16:06+5:30
घरमालकाची भूमिका संशयास्पद वाटते. युवकाने सुसाईड नोट लिहून आत्महत्या केली आहे.
लखनौ – उत्तर प्रदेशची राजधानी लखनौमध्ये स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या युवकानं स्वत:चं आयुष्य संपवलं आहे. गळफास घेण्यापूर्वी युवकाने आईच्या व्हॉट्सअपला I am Sorry म्हणत आई वडिलांची माफी मागितली आहे. जर वेळीच घरमालकाने दरवाजा उघडला असता तर युवकाचा जीव वाचला असता असं त्याच्या नातेवाईकांनी म्हटलं आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मृत युवक लखनौच्या बीबीडी परिसरात तिवारीगंज इथं भाड्याच्या खोलीत राहत होता. त्याचे वडील हरीश साहनी आणि आई माया हरदोई संडिला खासगी कंपनीत नोकरी करतात. आईनं सांगितले की, घटनेच्या दिवशी मुलाचा मेसेज आला. हा मेसेज पाहून मला चिंता पडली. मी त्याच्या मोबाईलवर वारंवार कॉल केला परंतु त्यानं फोन उचलला नाही. जेव्हा आम्ही त्याच्या खोलीवर गेलो तेव्हा आतून दरवाजा बंद होता.
आई वडिलांना पाठवला होता मेसेज
नातेवाईकांनी सांगितले की, जर वेळीच घरमालकाने दरवाजा उघडला नाही. जेव्हा २ तास दरवाजा उघडला नाही तेव्हा पोलिसांना या घटनेची माहिती देण्यात आली. घटनास्थळी पोहचलेल्या पोलिसांनी दरवाजा तोडला तेव्हा मुलाचा मृतदेह पंख्याला लटकलेल्या अवस्थेत सापडला. मुलानं जीव देण्यापूर्वी Thank you mummy papa for everything I’m Sorry असं लिहून पाठवले होते.
घरमालकावर दरवाजा न उघडल्याचा आरोप
सध्या पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहे. नातेवाईकांनी म्हटलं की, जर वेळीच घरमालकाने दरवाजा उघडला असता तर युवकाचे प्राण वाचले असते. घरमालकाची भूमिका संशयास्पद वाटते. युवकाने सुसाईड नोट लिहून आत्महत्या केली आहे. या प्रकरणाचा तपास करून योग्य तो निष्कर्ष काढला जाईल असं पोलिसांनी म्हटलं आहे.