मी भांग पितोय, मग म्हणाला मी अफू खातोय! भाजपा आमदाराचं पोलिसांना अजब उत्तर

By ऑनलाइन लोकमत | Published: March 10, 2022 01:27 PM2022-03-10T13:27:13+5:302022-03-10T13:30:41+5:30

Rajasthan Police : भाजप आमदार पूरम चौधरी म्हणाले की, भीनमाल येथील मुलीच्या अपहरणप्रकरणी पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्याला फोन केला असता त्यांनी आज शिवरात्री आहे, मी भांग पितोय, उद्या बोलू, नंतर प्रकरण बघू, असे उत्तर दिले. 

I drink cannabis, then said I eat opium! Police gave strange answer to BJP MLA | मी भांग पितोय, मग म्हणाला मी अफू खातोय! भाजपा आमदाराचं पोलिसांना अजब उत्तर

मी भांग पितोय, मग म्हणाला मी अफू खातोय! भाजपा आमदाराचं पोलिसांना अजब उत्तर

Next

जयपूर - बुधवारी राजस्थान विधानसभेत पोलीस आणि तुरुंग विभागाच्या अनुदानाच्या मागण्यांवरील चर्चेदरम्यान सत्ताधारी काँग्रेस आणि भारतीय जनता पक्षाच्या (भाजप) आमदारांनीपोलिसांच्या वागणुकीवरून सरकारला घेरले. यावेळी भाजप आमदार पूरम चौधरी म्हणाले की, भीनमाल येथील मुलीच्या अपहरणप्रकरणी पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्याला फोन केला असता त्यांनी आज शिवरात्री आहे, मी भांग पितोय, उद्या बोलू, नंतर प्रकरण बघू, असे उत्तर दिले. 

दुसऱ्या दिवशी मी त्याला फोन केला तेव्हा तो म्हणाला, मी अफू खातोय, असे उत्तर पोलीस अधिकाऱ्याने देणं हे आक्षेपार्ह असल्याचे त्यांनी सांगितले. त्यांच्या म्हणण्यानुसार पोलिस आरोपींना वाचवण्याचे काम करतात.

राजेंद्र राठोड म्हणाले, राजस्थानमध्ये सातत्याने गुन्हेगारी वाढत आहे
भाजप विधिमंडळ पक्षाचे उपनेते राजेंद्र राठोड म्हणाले की, राज्यात गुन्हेगारी सातत्याने वाढत आहे. ३९ टक्के महिला अत्याचार खोटे असल्याचे पोलीस महासंचालक सांगतात. त्यांनी महिलांवरच प्रश्न उपस्थित केले. महिलांवरील अत्याचाराचे १.१५ लाख गुन्हे दाखल झाले आहेत. दरवर्षी १७ हजार ६४५ बलात्कार होतात. राजस्थानमध्ये दररोज १८ बलात्कार होतात. राठोड म्हणाले की, नॅशनल क्राइम रेकॉर्ड ब्युरो (NCRB) च्या आकडेवारीनुसार, राजस्थान गुन्ह्यांच्या बाबतीत अव्वल स्थानावर पोहोचले आहे. पुढे राठोड म्हणाले की, गुन्ह्यांमध्ये सातत्याने वाढ होत आहे. २०२१ मध्ये १७८६ खून झाले होते, मात्र ९२९ हत्येचा गुंता सुटला असून 384 खुनाचे तपास प्रलंबित आहेत.

मुख्यमंत्र्यांचे सल्लागार आणि आमदार म्हणाले, पोलिसांच्या संगनमताने दारूची तस्करी होते
मुख्यमंत्र्यांचे सल्लागार आणि आमदार संयम लोढा म्हणाले की, पोलिसांच्या संगनमताने दारूची तस्करी होते. सिरोही जिल्ह्यात दारू तस्करांसह ४० पोलिसांची मिलीभगत असल्याचं समोर आली, मात्र कारवाई झाली नाही. संजय शर्मा यांनी अल्वरमधील मूकबधिर अल्पवयीन मुलीवर झालेल्या बलात्काराचा मुद्दा उपस्थित करताना सांगितले की, डॉक्टरांनी सामूहिक बलात्कार झाल्याबाबत सहमती दर्शवली, परंतु पोलीस अधीक्षकांनी ते नाकारले. पोलिस अधीक्षकांनी तीनदा जबाब बदलले. सरकारच्या दबावाखाली सामूहिक बलात्कार प्रकरण हा रस्ता अपघात असल्याचे सिद्ध करण्याचा पोलिसांचा प्रयत्न आहे. यावरून भाजप आमदारांनी सुमारे पाच मिनिटे गोंधळ घातला.

Web Title: I drink cannabis, then said I eat opium! Police gave strange answer to BJP MLA

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.