'माझ्याकडे तीन लाख रुपये, गुंड मागे लागलेत'; महावितरण कर्मचाऱ्याचा मृतदेह तापी नदीत

By देवेंद्र पाठक | Published: June 5, 2023 03:04 PM2023-06-05T15:04:26+5:302023-06-05T15:04:56+5:30

महावितरणचे सिनीअर ऑपरेटरचा  तापीत आढळला मृतदेह, हत्या की आत्महत्या याचा पोलिस घेताय शोध

'I have three lakhs of rupees, goons are after me'; Body of Mahavitran employee in Tapi river | 'माझ्याकडे तीन लाख रुपये, गुंड मागे लागलेत'; महावितरण कर्मचाऱ्याचा मृतदेह तापी नदीत

'माझ्याकडे तीन लाख रुपये, गुंड मागे लागलेत'; महावितरण कर्मचाऱ्याचा मृतदेह तापी नदीत

googlenewsNext

धुळे : महावितरण सबस्टेशनच्या कार्यालयात कार्यरत असलेले सिनिअर ऑपरेटर प्रवीण गवते यांचा  तापी नदीपात्रात मृतदेह आढळून आला. त्यांचा शोध घेतला असता साडेचार वाजेच्या सुमारास तापी नदीपात्रात त्यांचा मृतदेह आढळून आला आहे. त्यांनी आत्महत्या केली की घातपात केला याचा शोध पोलिस घेत आहेत.

शिरपूर तालुक्यातील बाळदे येथील सबस्टेशन येथे प्रवीण विजय गवते (वय ४२  रा. चिमठाणे) हे सिनीअर ऑपरेटर म्हणून कार्यरत होते. त्यांची दुचाकी रविवारी दुपारी तापी नदी पुलावर बेवारस स्थितीत आढळून आली होती. प्रवीण गवते यांची रात्रपाळी असल्याने ते रात्रीपासून बाळदे येथील सबस्टेशनवर होते.

सकाळी साडेआठ वाजता ते घरी चिमठाणे येथे जाण्यासाठी निघाले होते. त्याआधी प्रवीण गवते हे शिरपूर येथे गेल्याची माहिती होती. मात्र २ वाजून ५२ मिनिटांनी त्यांनी वॉटसअप ग्रुपवर एक मॅसेज टाकला होता. ग्रुपमधील मॅसेज वाचून त्यांना संपर्क देखील साधण्यात आला होता.

या घटनेनंतर त्यांची मोटरसायकल गिधाडे तापी पुलावर आढळून आली होती. त्यांचा गिधाडे तापी नदीपात्रात शोध सुरु केला असता दुपारी साडेचाार वाजेच्या सुमारास प्रवीण गवते यांचा तापीनदी पात्रात मृतदेह आढळून आला. त्यांचा मृतदेह शिंदखेडा येथील रुग्णालयात शवविच्छेदनासाठी दाखल करण्यात आला असून मयत प्रवीण गवते यांच्या या वॉटसअप ग्रुपवरील मॅसेजमुळे मात्र अनेक तर्क वितर्क लावण्यात येत आहे. याप्रकरणात पोलीस नेमकी काय भुमिका घेतात हे बघणे आवश्यक आहे.

ग्रृपवर मॅसेज येताच घटनेचा उलगडा
आत्महत्येपूर्वी त्यांनी वॉटसअप ग्रुपवर मॅसेज टाकला होता त्यात त्यांनी म्हटले की, माझ्या मागे ४-५ गुंड मुले लागले असून हे सर्व अनोळखी आहेत. मला काहीच सुचत नाहीये. माझ्यासोबत तीन लाख रूपये आहेत मी कसा तरी स्वत:ला वाचवण्याचा प्रयत्न करत असून मला मदत करावी, असा त्यांनी संदेश ग्रुपवर टाकला होता.

Web Title: 'I have three lakhs of rupees, goons are after me'; Body of Mahavitran employee in Tapi river

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.