'मी मुसेवालाची हत्या केली... ', ओवेसी पक्षाच्या गुजरात अध्यक्षांना जीवे मारण्याची धमकी

By ऑनलाइन लोकमत | Published: June 15, 2022 09:27 PM2022-06-15T21:27:03+5:302022-06-15T21:30:43+5:30

Threatening Case :अहमदाबादच्या गायकवाड हवेली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.

'I killed Musewala ...', aimim gujarat president sabir kabaliwala received death threats | 'मी मुसेवालाची हत्या केली... ', ओवेसी पक्षाच्या गुजरात अध्यक्षांना जीवे मारण्याची धमकी

'मी मुसेवालाची हत्या केली... ', ओवेसी पक्षाच्या गुजरात अध्यक्षांना जीवे मारण्याची धमकी

googlenewsNext

ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन (एआयएमआयएम) गुजराजचे अध्यक्ष साबीर काबलीवाला यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. फोनवर धमकी देणाऱ्या व्यक्तीने स्वत:चे नाव इमरान असल्याचे सांगितले. त्याचबरोबर जीव वाचवायचा असेल तर बॅग भरून पैसे द्यावे लागतील, असे कबालीवाला यांना सांगण्यात आले. अहमदाबादच्या गायकवाड हवेली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.

साबीर काबलीवाला यांना कॉलवर धमकी देणाऱ्या इम्रानने सांगितले की, मी मुसेवालाची हत्या केली आहे. तुला तुझा जीव वाचवायचा असेल तर मला बॅग भरून पैसे द्यावे लागतील.” हे ऐकून एआयएमआयएम नेते काबलीवाला आपल्या समर्थकांसह पोलिस स्टेशनमध्ये पोहोचले आणि अज्ञात आरोपींविरोधात धमकीचा गुन्हा दाखल केला.

साबीर काबलीवाला यापूर्वी गुजरात काँग्रेसमध्ये होते. यानंतर ते AIMIM मध्ये सामील झाले आणि पक्षाच्या गुजरात युनिटचे अध्यक्ष झाले. पोलिसांनी आता फोनवर आलेल्या या धमकीचा तपास सुरू केला आहे. सायबर तज्ज्ञांच्या मदतीने आरोपींच्या संख्येचा शोध घेतला जात आहे.

29 मे रोजी मानसा जिल्ह्यातील जवाहरके गावात पंजाबी गायक सिद्धू मुसेवाला यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. या हत्याकांडाची जबाबदारी कॅनडात बसलेल्या गँगस्टर गोल्डी ब्रार आणि तिहार तुरुंगात बंद असलेल्या लॉरेन्स बिश्नोईने घेतली होती. याप्रकरणी दिल्ली आणि पंजाब पोलिसांचा तपास सुरू आहे. या हत्येशी संबंधित अनेक संशयितांना अटक करून त्यांची चौकशी सुरू आहे.

 

 

Web Title: 'I killed Musewala ...', aimim gujarat president sabir kabaliwala received death threats

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.