पतीनं भिंतीवर लिहिलं 'मी बायकोला मारून टाकलं'; धारदार शस्त्राने निर्दयी हत्या

By ऑनलाइन लोकमत | Published: April 19, 2022 05:00 PM2022-04-19T17:00:30+5:302022-04-19T17:00:59+5:30

हत्येच्या घटनेनंतर आरोपीने खोलीच्या भिंतीवर मी बायकोला मारून टाकलं असं लिहून ठेवले

I Killed My Wife Husband Wrote On Wall After Murder Wife at Bihar | पतीनं भिंतीवर लिहिलं 'मी बायकोला मारून टाकलं'; धारदार शस्त्राने निर्दयी हत्या

पतीनं भिंतीवर लिहिलं 'मी बायकोला मारून टाकलं'; धारदार शस्त्राने निर्दयी हत्या

Next

सीतामढी – बिहारच्या सीतामढी जिल्ह्यात पतीनं त्याच्या पत्नीची निर्दयी हत्या केल्याचं उघड झालं आहे. हत्येनंतर या आरोपीनं घटनास्थळावर भिंतीवर मी माझ्या बायकोला मारून टाकलं असं लिहिलं होते. ही खळबळजनक घटना पुनौरा येथील परिसरात घडली आहे. घटनेची माहिती मिळताच तात्काळ पोलीस घटनास्थळी पोहचली आणि मृत महिलेचा मृतदेह ताब्यात घेऊन पोस्टमोर्टमला पाठवला आहे. तर आरोपी पती फरार आहे.

सोमवारी रात्रीची ही घटना आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, अजय राऊत नावाची व्यक्ती पत्नी रेखा देवी आणि ३ मुलांसह भाड्याने घेतलेल्या घरात राहत होते. अजय गल्लोगल्ली जाऊन सामान विकण्याचं काम करत होता. सोमवारी रात्री कुठल्यातरी कारणावरून पती-पत्नी दोघांमध्ये वाद झाला होता. त्यात संतापलेल्या अजयने धारदार हत्याराने पत्नीचा गळा कापून तिची हत्या केली.

हत्येच्या घटनेनंतर आरोपीने खोलीच्या भिंतीवर मी बायकोला मारून टाकलं असं लिहून ठेवले. तसेच दुसऱ्या भिंतीवर मी बायकोला मारलं त्यात कुणाचाही हात नाही हे लिहून आरोपी फरार झाला. पुनौरा पोलीस अधिकारी शिवचंद्र यादव यांनी सांगितले की, मंगळवारी सकाळी घटनेनंतर पोलीस घटनास्थळी पोहचले आणि त्यांनी मृतदेह ताब्यात घेऊन पोस्टमोर्टम करण्यासाठी हॉस्पिटलला पाठवला.

वादविवादातून हत्या झाल्याचा अंदाज

पोलीस अधिकारी म्हणाले की, या महिलेची हत्या नेमक्या कोणत्या कारणामुळे झाली याचा शोध घेतला जात आहे. सुरुवातीच्या चौकशीत पती-पत्नीच्या वादविवादातून ही हत्या झाल्याचं बोललं जात आहे. घटनेच्या वेळी घरात ३ मुलं झोपली होती. आरोपीच्या अटकेसाठी धाडी टाकल्या जात आहे.

Web Title: I Killed My Wife Husband Wrote On Wall After Murder Wife at Bihar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.