I Love U Papa, अखेरचा मेसेज वडिलांना पाठवला; घरापासून दूर मुलाचा मृतदेह सापडला

By ऑनलाइन लोकमत | Published: January 24, 2023 07:08 PM2023-01-24T19:08:06+5:302023-01-24T19:08:17+5:30

तेजसच्या बारावीच्या परीक्षा जवळ आल्या होत्या. तो अभ्यासात फारसा हुशार नव्हता.

I Love U Papa, last message sent to dad; The boy's body was found far from the house In Agra | I Love U Papa, अखेरचा मेसेज वडिलांना पाठवला; घरापासून दूर मुलाचा मृतदेह सापडला

I Love U Papa, अखेरचा मेसेज वडिलांना पाठवला; घरापासून दूर मुलाचा मृतदेह सापडला

Next

आग्रा - उत्तर प्रदेशातील आग्रा इथे १२ वीच्या वर्गात शिकणाऱ्या मुलानं आत्महत्या केली आहे. घरापासून ३ किमी अंतरावर एका इमारतीत त्याचा मृतदेह पोलिसांना सापडला. या मुलाने इमारतीवरून उडी मारली त्यात त्याचा जीव गेला. मृत्यूपूर्वी त्याने वडिलांना I Love You Papa असा मेसेज पाठवला. त्यानंतर काही तासांत मुलाचा मृतदेह आढळल्याने खळबळ माजली आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार, मुलगा त्याच्या शिक्षणाला घेऊन खूप टेन्शनमध्ये होता. घरातून ट्यूशनला जाण्यासाठी तो निघाला. सिकंदरा येथील दहटोरा येथे राहणारा १७ वर्षीय तेजस हा १२वीत शिकत होता. सोमवारी कोचिंगला जात असल्याचे सांगून तो सायंकाळी सहा वाजता घरातून सायकल घेऊन निघाला होता. यानंतर काही वेळातच तेजसने त्याच्या वडिलांच्या मोबाईलवर I Love You Papa असा मेसेज पाठवला. यानंतर वडिलांनी त्याच्या मोबाईलवर अनेकदा कॉल केला, मात्र त्याने त्यांच्या कॉलला उत्तर दिले नाही.

वडिलांनी नऊ वाजण्याच्या सुमारास सिकंदरा पोलीस ठाण्यात माहिती दिली. रात्री पोलिसांनी तेजसचा शोध सुरू केला. रात्री ११.३० च्या सुमारास तेजसचा मृतदेह आग्रा डेव्हलपमेंट अॅथॉरिटीच्या शास्त्रीपुरम हाइट्स इमारतीत आढळून आला. तेजसचा मृतदेह पाहून घरात एकच खळबळ उडाली. रडून रडून पालकांची अवस्था वाईट झाली आहे.

अभ्यासाचं टेन्शन होतं
तेजसच्या बारावीच्या परीक्षा जवळ आल्या होत्या. तो अभ्यासात फारसा हुशार नव्हता. त्याला आपल्या कुटुंबाची आणि शाळेची खूप काळजी वाटत होती. याबाबत त्याने वडिलांना अनेकदा सांगितले होते. मात्र त्याचा मानसिक ताण इतका वाढला की त्याने आपले जीवन संपवले.  

घरात पसरली शोककळा
वडील एका कारखान्यात खासगी नोकरी करतात. तेजस त्यांचा एकुलता एक मुलगा होता. तेजसची सायकल शास्त्रीपुरम हाइट्सच्या इमारतीबाहेर सापडली. इमारतीच्या आत पाहिले असता तेजसचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात पडलेला होता. त्याच्या हात आणि पायाची हाडे मोडली. सिकंदरा स्टेशनचे प्रभारी निरीक्षक आनंद कुमार शाही यांनी सांगितले की, तेजसने इमारतीवरून उडी मारून आत्महत्या केल्याचा संशय आहे. परंतु पोलीस अद्याप तपास करत आहेत.

Web Title: I Love U Papa, last message sent to dad; The boy's body was found far from the house In Agra

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.