माझं तुझ्या मुलीवर प्रेम आहे, तिला माझ्या स्वाधीन कर नाहीतर ॲसिड फेकेन... माथेफिरू प्रियकराची करतूद
By ऑनलाइन लोकमत | Published: February 14, 2022 06:46 PM2022-02-14T18:46:21+5:302022-02-14T18:46:55+5:30
Crime News :त्याने हातात ॲसिड घेऊन मुलीवर फेकण्याचा प्रयत्न केला. दरम्यान, हाणामारी पाहून लोकांच्या जमावाने त्याला पकडले.
पानिपत - हरियाणातील पानिपतमध्ये एका माथेफिरू प्रियकराने हे भयंकर कृत्य करण्याचा कट रचला. यूपीहून ॲसिड घेऊन माथेफिरू पानिपतला पोहोचला होता. जिथे त्याने आवडणारी मुलगी आणि कंपनीतून काम करून घरी परतणाऱ्या तिच्या आईचा मार्ग अडवला. यानंतर त्याने मुलीचा हात पकडला, त्याला मुलीच्या आईने विरोध केला, त्यानंतर दोघांत धक्काबुक्की सुरू झाली. त्याने हातात ॲसिड घेऊन मुलीवर फेकण्याचा प्रयत्न केला. दरम्यान, हाणामारी पाहून लोकांच्या जमावाने त्याला पकडले.
स्थानिक लोकांनी 112 वर कॉल करून पोलीस नियंत्रण कक्षाला माहिती दिली. माहिती मिळताच पोलिसांनी धाव घेत आरोपीला ताब्यात घेतले. त्यानंतर किशनपुरा आणि चांदनीबाग पोलिस स्टेशनही पोहोचले आणि मुलीच्या जबाबाच्याआधारे आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपीला आज न्यायालयात हजर करून पोलीस पुढील कारवाई करणार आहेत.
आजीसोबत प्रवचनासाठी गेलेल्या मुलीचे अपहरण, दोन अल्पवयीन मित्रांनी केला गॅंगरेप
खासदार राजेंद्र गावित यांना कोर्टाचा दणका, कोर्टाने सुनावली शिक्षा अन् रक्कम भरण्याचे दिले आदेश
ही घटना शहरातील सर्वात वर्दळीच्या शिवनगर येथील आहे. जिथे शनिवारी सायंकाळी 6.30 च्या सुमारास महिला आपल्या 20 वर्षीय मुलीसोबत काम करून घरी परतत होती. ती तिच्या गल्लीजवळ पोहोचली तेव्हा अचानक दोन मुलांनी रस्ता अडवला. त्यापैकी एकाने डोक्यावर टोपी आणि तोंडावर मास्क घातलेला होता. दुसरीकडे, दुसरा आरोपी योगेश याने मास्क घातलेला नव्हता. योगेश हा यूपीतील सीतापूरचा रहिवासी आहे.
मुलीच्या आईला धमकावले
योगेशने मुलीचा हात धरला. ज्याला आई आणि मुलगी दोघांनीही विरोध केला होता. त्यावर मुलगा महिलेला म्हणाला की, मला तुझी मुलगी आवडते आणि तिला माझ्याकडे सोपव. ती माझ्यासोबत राहील. जर तुम्ही तिला माझ्या ताब्यात दिले नाही तर मी तिच्यावर ॲसिड टाकेन. त्याच्या भावांनाही मारून टाकीन. हे ऐकल्यानंतर ती महिला आपल्या मुलीला वाचवण्यासाठी त्याच्यासमोर उभी राहिली. योगेशने मित्राच्या हातातून ॲसिड मागवण्याचा इशारा करताच घटनास्थळी बघ्यांची गर्दी झाली. गर्दी पाहून योगेशच्या मित्राने त्याच्यासह ॲसिड टाकून घटनास्थळावरून पळ काढला. तर योगेशला लोकांनी पकडले.
दोन वर्षांपूर्वीही या मुलीला घेऊन गेले होते
माहितीनुसार, पोलीस तपासात उघड झाले आहे की, ऑक्टोबर 2020 मध्ये पीडित मुलगी 18 वर्षांची असताना ती संशयास्पदरित्या घरातून बेपत्ता झाली होती. चार दिवसांनी मुलगी कानपूरमध्ये सापडली. पोलिस चौकशीत पीडितेने सांगितले की, योगेश तिला आमिष दाखवून सोबत घेऊन गेला होता. यानंतर तरुणीचा योगेशशी संपर्क तुटला होता. पण मुलाने हार मानली नाही. योगेशने गेल्या अनेक महिन्यांपासून तरुणीवर ॲसिड फेकण्याची, भावांना जीवे मारण्याची तसेच इतर धमक्या दिल्याचा आरोप आहे. अॅसिड हल्ला करण्याच्या उद्देशाने आरोपी शुक्रवारी सायंकाळी तरुणीसमोर आला होता.
पानिपतमधील ॲसिड हल्ल्याची घटना पहिली नाही
याआधीही पानिपतमध्ये ॲसिड हल्ला झाला असून पोलिसांना अद्याप आरोपींना अटक करण्यात यश आलेले नाही. तर पोलिसांनी आरोपींवर लाखो रुपयांचे बक्षीस ठेवले आहे. असे असतानाही पोलिसांचे हात रिकामे आहेत. मात्र, यावेळी स्थानिक लोकांनी आरोपीला पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले आहे.