पोलिसांसोबत न जाण्यासाठी मी कपडे काढले; मॉडेलने केला खुलासा
By ऑनलाइन लोकमत | Published: October 31, 2018 07:49 PM2018-10-31T19:49:54+5:302018-10-31T19:50:18+5:30
ते माझ्यावर बलात्कार करतील वा माझी हत्या करतील या भीतीने आणि मी माझ्या अंगावरचे कपडे काढले, असेही मॉडेलने सांगितले. पोलीस मला रात्रीच्या अडीच वाजता पोलीस ठाण्यात नेण्यासाठी होते. त्यांच्यासोबत महिला पोलीसही नव्हत्या.
मुंबई - ओशिवरा परिसरातील एका उच्चभ्रू इमारतीत एका मॉडेलने दारू पिऊन चांगलाच धिंगाणा घातला होता . एवढ्यावरच न थांबता मद्यधुंद अवस्थेत लिफ्टमध्ये तिने स्वतःचे कपडेही काढले होते. या घटनेचा व्हिडीओ नुकताच सोशल मीडियावर वायरल झाला होता. या मॉडेलने बिल्डिंगच्या वॉचमनला सिगारेट आणण्यास सांगितले. मात्र, त्याने नकार दिल्याने तिने हा धंगाणा घातला होता.मेघा शर्मा असं या मॉडेलचं नाव असून तिने टीईची बाजू मांडत या घटनेचा खुलासा केला आहे. ते माझ्यावर बलात्कार करतील वा माझी हत्या करतील या भीतीने आणि मी माझ्या अंगावरचे कपडे काढले, असेही मॉडेलने सांगितले. पोलीस मला रात्रीच्या अडीच वाजता पोलीस ठाण्यात नेण्यासाठी होते. त्यांच्यासोबत महिला पोलीसही नव्हत्या. त्यांना विरोध करण्यासाठी मी माझा नाईट ड्रेस काढला आणि तुमच्या सोबत येणार नाही असं सांगितलं
मॉडेल मेघा शर्माने त्या रात्री मी वॉचमनला सिगारेट आणण्यास सांगितले. परंतु त्याने मी ड्यूटीवर असल्याने जाणार नाही असे उत्तर दिले. त्यानंतर त्याने एका सिगारेट विक्रेत्याचा नंबर दिला आणि फोन करण्यास सांगितले. परंतु रात्र जास्त झाल्याने मी त्याला फोन न करता स्वत: सिगारेट आणण्यासाठी गेले. बाहेर तीन-चार वॉचमन असतानाही मला सिगारेट आणण्यासाठी जावे लागले. मी त्यांना याबाबत सुनावल्यावर त्याने माझ्याबाबत अपशब्द वापरले आणि चारित्र्यहीन मुलगी असल्याचे सुनावले. सिगारेटच्या घटनेनंतर वॉचमनने पोलिसांना फोन केला. पोलीस मला रात्रीच्या अडीच वाजता पोलीस ठाण्यात नेण्यासाठी होते. त्यांच्यासोबत महिला पोलीसही नव्हत्या. त्यांना विरोध करण्यासाठी मी माझा नाईट ड्रेस काढला आणि तुमच्या सोबत येणार नाही असं सांगितलं. तेव्हा पोलीस निघून गेले, असेही तिने सांगितले. ते माझ्यावर बलात्कार करणार नाही ना किंवा माझी हत्या करणार नाही ना? या भीतीने आणि मी माझ्या अंगावरचे कपडे काढले, असेही मॉडेलने सांगितले.
#WATCH: Model Megha Sharma, who in a viral video was seen thrashing a security guard and sitting in protest when the police came to take her, narrates the chain of events which took place at the time of the incident. #Mumbaipic.twitter.com/iWvHHVH9Mu
— ANI (@ANI) October 30, 2018
Video : सिगारेट आणून न दिल्याने मद्यधुंद मॉडेलने कपडे काढून घातला धिंगाणा