मला तुमची प्रॉपर्टी खरेदी करायची आहे! अशी बतावणी करत शिक्षिकेला घातला ऑनलाईन गंडा 

By ऑनलाइन लोकमत | Published: November 3, 2020 09:57 PM2020-11-03T21:57:53+5:302020-11-03T21:58:41+5:30

Farud : साधना  यांनी त्यांच्या मोबाईलमध्ये आलेला क्युआर कोड स्कॅन केला. यानंतर त्यांनी बँकेत असलेल्या खात्यातून झालेले व्यवहार बघितला असता त्यांच्या खात्यातूून ९ वेळा ७९ हजार ८ रुपये इतकी रक्कम ट्रान्सफर झाल्याचे दिसून आले.

I want to buy your property! Pretending to be such, the teacher waslooted online | मला तुमची प्रॉपर्टी खरेदी करायची आहे! अशी बतावणी करत शिक्षिकेला घातला ऑनलाईन गंडा 

मला तुमची प्रॉपर्टी खरेदी करायची आहे! अशी बतावणी करत शिक्षिकेला घातला ऑनलाईन गंडा 

googlenewsNext
ठळक मुद्दे रिंगरोड परिसरातील अजय कॉलनीत साधना सुनील थत्ते या शिक्षीका पतीसह वास्तव्यास आहेत. त्यांनी घरगुती व्यवहारासाठी स्टेट बँकेत अकाऊंट उघडले असून त्या अकाऊंटला पेटीएम ज्वाईन केले आहे.

जळगाव : मी तुमची प्रॉपर्टी बघून आलोय, ती मला खरेदी करायची असल्याने मी तुम्हाला अ‍ॅॅडव्हान्स देतो. त्यासाठी तुमच्या मोबाईमध्ये पेटीएम ओपन करा असे म्हणत साधना सुनील थत्ते या शिक्षिकेला ७० हजार रुपयांचा ऑनलाईन गंडा घातल्याची घटना ३० ऑक्टोबर रोजी घडली. याप्रकरणी मंगळवारी  सायंकाळी जिल्हापेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 रिंगरोड परिसरातील अजय कॉलनीत साधना सुनील थत्ते या शिक्षीका पतीसह वास्तव्यास आहेत. त्यांनी घरगुती व्यवहारासाठी स्टेट बँकेत अकाऊंट उघडले असून त्या अकाऊंटला पेटीएम ज्वाईन केले आहे. ३० ऑक्टोंबर रोजी त्यांना  राकेश शर्मा नामक व्यक्तीचा फोन आला. त्याने साधना थत्ते यांना मी तुमची प्रॉपर्टी बघितली असून मला ती खरेदी करायची आहे. त्यासाठी मी तुम्हाला ऍडव्हान्स देत असल्याचे सांगितले. मी पाठविलेला क्युआर कोड तुमच्या पेटीएममध्ये स्कॅन करा. तुमच्या खात्यात ऍडव्हान्स आलेला दिसेल असे त्याने सांगितले. साधना  यांनी त्यांच्या मोबाईलमध्ये आलेला क्युआर कोड स्कॅन केला. यानंतर त्यांनी बँकेत असलेल्या खात्यातून झालेले व्यवहार बघितला असता त्यांच्या खात्यातूून ९ वेळा ७९ हजार ८ रुपये इतकी रक्कम ट्रान्सफर झाल्याचे दिसून आले.


फसवणूक झाल्याचे कळताच तक्रार दाखल त्या शिक्षीकेने राकेश शर्माला ऍडव्हान्सचे पैसे जमा झाले नसल्याचे सांगण्यासाठी फोन केला. त्यानंतर त्यांच्या खात्यातून पैसे ट्रान्सफर झाले असल्याचे त्या इसमाला सांगताच त्याने साधना थत्ते यांचा फोन कट केला. त्यानंतर थत्ते यांनी वारंवार त्यांना फोन केला असता तो इसम त्यांचा फोन घेत नसल्याने आपली फसवणुक झाल्याचे लक्षात आले. त्यांनी मंगळवारी जिल्हापेठ पोलिसात धाव घेत राकेश शर्मा नामक व्यक्ती विरुद्ध तक्रार दाखल केले. त्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक अकबर पेटेल करीत आहे.

 

Web Title: I want to buy your property! Pretending to be such, the teacher waslooted online

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.