'मला तुमच्या मुलीशी लग्न करायचे आहे...' वडिलांना मान्य नसल्याने तरुणाने झाडल्या गोळ्या

By ऑनलाइन लोकमत | Published: February 20, 2022 04:42 PM2022-02-20T16:42:33+5:302022-02-20T16:43:45+5:30

Firing Case :परिसरात गोळीबार झाल्याची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचले, जखमी आरोपीला ताब्यात घेऊन जवळच्या रुग्णालयात दाखल केले.

'I want to marry your daughter ...'man shot girl father for refusing to marry in delhi | 'मला तुमच्या मुलीशी लग्न करायचे आहे...' वडिलांना मान्य नसल्याने तरुणाने झाडल्या गोळ्या

'मला तुमच्या मुलीशी लग्न करायचे आहे...' वडिलांना मान्य नसल्याने तरुणाने झाडल्या गोळ्या

Next

राजधानी दिल्लीतील दयालपूर भागात एका तरुणाने लग्नास नकार दिल्याने मुलीच्या वडिलांवर गोळ्या झाडल्या. तरुणीच्या वडिलांवर गोळी झाडून तरुण पळून जाण्याचा प्रयत्न करत होता. यादरम्यान पायऱ्या उतरत असताना तरुण जखमी झाला. गोळीबाराचा आवाज ऐकून आजूबाजूचे लोक घरात जमा झाले आणि त्यांनी तरुणाला बेदम मारहाण केली. परिसरात गोळीबार झाल्याची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचले, जखमी आरोपीला ताब्यात घेऊन जवळच्या रुग्णालयात दाखल केले.

वास्तविक, जखमी वडील शौकीन दयालपूरच्या मुस्तफाबाद भागात कुटुंबासोबत राहतात आणि ते भंगार विक्रेता आहे. त्यांच्या मुलाचा चुलत भाऊ इम्तियाज त्याच्या मुलीला सतत फोन करत असे. त्यानंतर त्याला अनेक वेळा समजावले, त्यानंतरही तो मुलगा मुलीशी लग्न करणार यावर ठाम होता. 

सतत समज देऊनही इम्तियाजने १५ फेब्रुवारीला घरी पोहोचून मुलीच्या वडिलांना जीवे मारण्याची धमकी दिली. मात्र, काही वेळाने इम्तियाज तेथून निघून गेला. यानंतर अचानक १६ फेब्रुवारीला इम्तियाज पुन्हा एकदा मुलीच्या घरी पोहोचला आणि मुलीच्या वडिलांना गच्चीवर बोलण्याच्या बहाण्याने घेऊन गेला.

यादरम्यान इम्तियाजने मुलीच्या वडिलांना अनेकवेळा लग्नासाठी विचारणा केली, मात्र ते होकार देत नव्हते. त्यानंतर इम्तियाजने कमरेतील पिस्तूल काढू गोळीबार केला. गोळी तरुणीचे शौकीनच्या डोक्याच्या तळाशी लागली. मुलीच्या वडिलांवर गोळी झाडल्यानंतर इम्तियाज पळून जाण्याच्या प्रयत्नात असताना पायऱ्यांवर पाय घसरला आणि तो पडला. यानंतर लोकांनी त्याला बेदम मारहाण करून पोलिसांच्या ताब्यात दिले. सध्या पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेऊन चौकशी सुरू केली आहे.

Web Title: 'I want to marry your daughter ...'man shot girl father for refusing to marry in delhi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.