मला पिझ्झा ऑर्डर करायचा आहे, पोलिसांना फोन करून मुलगी म्हणाली... मग?
By ऑनलाइन लोकमत | Published: April 7, 2022 04:02 PM2022-04-07T16:02:30+5:302022-04-07T16:12:16+5:30
Woman called police and ordered pizza : ऑपरेटरने तिला समस्या विचारली तेव्हा महिलेने तिला पिझ्झा हवा असल्याचे सांगितले.
एका महिलेने आपत्कालीन क्रमांकावर मदतीसाठी पोलिसांना कॉल केला. मात्र, मदत मागण्याऐवजी तिने पिझ्झा ऑर्डर करायला सुरुवात केली. यामुळे इमर्जन्सी कॉल हाताळणाऱ्या ऑपरेटरला त्या महिलेचा राग आला नाही, उलट ती महिला खरोखरच अडचणीत सापडली असेल का हे जाणून घेण्यासाठी तिने मनापासून धाव घेतली. ब्रिटनच्या नॉर्थ यॉर्कशायर पोलिसांनी ही घटना ट्विटरवर शेअर केली आहे.
खरं तर, एका महिलेने मंगळवारी नॉर्थ यॉर्कशायर पोलिसांच्या आपत्कालीन क्रमांकावर कॉल केला. ऑपरेटरने तिला समस्या विचारली तेव्हा महिलेने तिला पिझ्झा हवा असल्याचे सांगितले. मात्र, हे ऐकूनही ऑपरेटरने फोन कट केला नाही आणि महिलेशी बोलणे सुरूच ठेवले. काही वेळाने त्यांनी तिच्या प्रश्नाचे उत्तर होय किंवा नाही मध्येच द्यावे असे सांगितले.
ऑपरेटरने विचारले की, तू अडचणीत आहे का? प्रत्युत्तरात ती महिला म्हणाली- होय. हे समजताच त्यांनी तात्काळ आपत्कालीन सेवांना सूचना दिली. ऑपरेटरशी बोलत असताना पोलिसांनी महिलेचे ऑनलाइन लोकेशन शोधून तेथे एक टीम पाठवली. वास्तविक ती महिला बसमध्ये होती आणि तिला तिच्या सहप्रवाशापासून धोका होता.
महिलेच्या ठिकाणी पोहोचल्यानंतर पोलिसांनी तिच्या सहप्रवाशाला अटक केली. मात्र, चौकशीनंतर त्याला सोडून देण्यात आले. यासोबतच महिलेला सुखरूप तिच्या घरी आणण्यात आले. ही घटना शेअर करताना पोलिसांनी ट्विटरवर लिहिले- 'पिझ्झा ऑर्डर करण्यासाठी आलेला कॉल ही मदतीची विनंती देखील असू शकते.'
When a call 'to order pizza' becomes an urgent plea for help...📞
— North Yorkshire Police (@NYorksPolice) April 6, 2022
We received a 999 call – but when it was answered, the woman on the line said she would like to order a pizza.
Our call handler immediately asked the woman if she was in trouble, to which she confirmed “yes”.