'तुम्हा दोघा भावांना संपवून टाकू'; तलवार घेऊन मागे लागले, खंड्या, बघ्या, दोधा, बटाट्याविरुध्द गुन्हा दाखल

By ऑनलाइन लोकमत | Published: December 15, 2022 03:24 PM2022-12-15T15:24:25+5:302022-12-15T15:33:03+5:30

तरुणाच्या मागे तलवार घेऊन पळत सुटल्या प्रकरणी ४ जणांविरोधात जळगावमध्ये गुन्हा दाखल झाला आहे.

'I will kill you two brothers'; They retreated with a sword, a case was filed against Khandya, Baghya, Dodha, Batatya | 'तुम्हा दोघा भावांना संपवून टाकू'; तलवार घेऊन मागे लागले, खंड्या, बघ्या, दोधा, बटाट्याविरुध्द गुन्हा दाखल

'तुम्हा दोघा भावांना संपवून टाकू'; तलवार घेऊन मागे लागले, खंड्या, बघ्या, दोधा, बटाट्याविरुध्द गुन्हा दाखल

Next

जळगाव : तुझ्या भावाने आमच्याशी वाद घातला, तुम्हा दोघा भावांना संपवून टाकू म्हणत खुशाल मुकुंदा ठाकूर (१८, रा. तुकारामवाडी) या तरुणाच्या मागे तलवार घेऊन पळत सुटल्या प्रकरणी एमआयडीसी पोलिस चार जणांविरुद्ध मंगळवारी रात्री गुन्हा दाखल झाला आहे. ही घटना मंगळवारी रात्री ८.३० वाजेच्या सुमारास तुकारामवाडीत घडली. 

ठाण्यात खुशाल ठाकूर हा तुकारामवाडीत कुटुंबासह वास्तव्यास आहे. मंगळवारी रात्री ८.३० वाजता खुशाल हा तुकारामवाडीतील एका इलेक्ट्रिक डीपीजवळ बसलेला होता. त्याठिकाणी आकाश ऊर्फ खंड्या सुकलाल ठाकूर (२२), पवन ऊर्फ बघा दिलीप बाविस्कर (२२), चेतन ऊर्फ बटाट्या रमेश सुशिर (१८) व उमाकांत ऊर्फ दोधा दत्तात्रय धोबी (१८) हे वेगवेगळ्या दुचाकीने आले.

आफताब पुरता अडकला; श्रद्धाच्या जंगलात सापडलेल्या हाडांनी भक्कम पुरावा दिला...!

परवा तुझ्या भावाने आमच्याशी वाद घातला. तुम्हा दोघा भावांना पाहून घेऊ आणि संपवून टाकू अशी धमकी आकाश व चेतन याने खुशाल याला दिली. नंतर तो तेथून घाबरून घराकडे पळू लागला. चौघांनी त्याचा पळत पाठलाग केला. त्यावेळी आकाश याच्या हातात तलवार होती. 

खुशाल हा जोरजोरात आरडा-ओरड करत पळत असल्यामुळे तेथे त्याची आजी मंजुळाबाई या आल्या. मात्र, त्यांना सुध्दा चौघांनी दमदाटी करून शिवीगाळ केली. मंजुळाबाई यांनी आरडा-ओरड केल्यानंतर चौघांनी तेथून पळ काढला. अखेर रात्री खुशाल ठाकूर याने एमआयडीसी पोलिस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिली. त्यानुसार चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

महिला तुरुंग अधिकारी कैद्याच्या प्रेमात; किसच्या बदल्यात..., अधिकारीही पडले बुचकळ्यात!

गिरणा पंपिंग परिसरातून अटक-

पोलिस निरिक्षक जयपाल हिरे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक फौजदार अतुल वंजारी, रामकृष्ण पाटील, हेमंत कळसकर, सुधीर साळवे, चंद्रकांत पाटील, इम्रान सैय्यद, गोविंदा पाटील, सचिन पाटील, राहुल रगडे, साईनाथ मुंडे, इम्तियाज खान यांनी चौघाही संशयितांना गिरणा पंपिंग परिसरातून अटक केली आहे.

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"    

Web Title: 'I will kill you two brothers'; They retreated with a sword, a case was filed against Khandya, Baghya, Dodha, Batatya

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.