"आम्हाला तर ट्रकचं वाटलं"; फायटर जेटचं चोरी केलेलं टायर चोरांनी आणून दिलं परत

By ऑनलाइन लोकमत | Published: December 6, 2021 10:48 AM2021-12-06T10:48:20+5:302021-12-06T10:49:24+5:30

मिराज २००० आणि लढाऊ जेटचे नवे टायर्स आणि हवाई दलाची उपकरणं जोधपूर एअरबेसपर्यंत नेण्यात येत होती.

iaf fighter jets mirage tire allegedly stolen in lucknow from moving truck | "आम्हाला तर ट्रकचं वाटलं"; फायटर जेटचं चोरी केलेलं टायर चोरांनी आणून दिलं परत

"आम्हाला तर ट्रकचं वाटलं"; फायटर जेटचं चोरी केलेलं टायर चोरांनी आणून दिलं परत

Next

२७ नोव्हेंबर रोजी लखनौमध्ये चालत्या ट्रकमधून भारतीय हवाई दलाच्या (IAF) मिराज लढाऊ विमानाचं चोरीला गेलेलं टायर सापडलं आहे. उत्तर प्रदेश पोलिसांनी यासंदर्भातील माहिती दिली. टायर लखनऊच्या बक्षी का तालब एअरफोर्स स्टेशनवरून राजस्थानमधील जोधपूर एअरबेसमध्ये नेलं जात होतं. 

दोन जण ४ डिसेंबर रोजी बक्षी का तालाब एअर फोर्स स्टेशनवर टायर घेऊन आले आणि ज्या ठिकाणी चोरीची तक्रार दाखल झाली होती त्या ठिकाणी रस्त्यावर त्यांना ते सापडल्याचं पोलिसांनी निवेदनात म्हटलं. त्याचवेळी ट्रकचा टायर समजून घरी नेल्याचं त्यांनी सांगितलं. एअर फोर्स स्टेशनने पुष्टी केली आहे की टायर त्यांच्या सप्लाय डेपोचा होता आणि ते मिराज जेटचे होते.


लखनौच्या शहीद पथ परिसरात मिराज-2000 (IAF फायटर जेट्स) फायटर जेट्स आणि हवाई दलाच्या इतर उपकरणांच्या नवीन टायर्सची खेप बक्षी का तालाब एअरफोर्स स्टेशनवरून जोधपूर एअरबेसकडे नेली जात असताना ही चोरी झाली. चोरीनंतर ट्रक चालकाने लखनौ पोलिसांत एफआयआर दाखल केला होता. शहरातून बाहेर पडण्याचा प्रयत्न करत असताना थोडावेळ थांबल्याचं त्यानं सांगितलं. त्याचवेळी ही चोरी झाली.

Web Title: iaf fighter jets mirage tire allegedly stolen in lucknow from moving truck

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.