IAS अधिकाऱ्याच्या मुलाने केली आत्महत्या; सहाव्या मजल्यावरून मारली उडी 

By ऑनलाइन लोकमत | Published: December 26, 2021 05:42 PM2021-12-26T17:42:12+5:302021-12-26T17:42:50+5:30

IAS officer's son commits suicide : क्राईम टीम आणि एफएसएल टीमने घटनास्थळाची पाहणी केली आहे. आतापर्यंत कुठलाही गैरप्रकार झाल्याची भीती नसून पुढील तपास सुरू आहे.

IAS officer's son commits suicide; Jumped from the sixth floor | IAS अधिकाऱ्याच्या मुलाने केली आत्महत्या; सहाव्या मजल्यावरून मारली उडी 

IAS अधिकाऱ्याच्या मुलाने केली आत्महत्या; सहाव्या मजल्यावरून मारली उडी 

Next

दिल्ली CWG गावात राहणाऱ्या १५ वर्षीय मुलाने इमारतीच्या सहाव्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केली. जेव्हा मुलाने हे भयानक पाऊल उचलले तेव्हा त्याचे आई-वडील मयूर विहार मार्केटमध्ये होते आणि मुलगा घरी एकटाच होता. अपघातानंतर शेजाऱ्यांनी त्याला मॅक्स हॉस्पिटलमध्ये नेले, तेथे उपचारानंतर त्याला मृत घोषित करण्यात आले. ही घटना शनिवारी रात्री 8.30 च्या सुमारास घडली.

क्राईम टीम आणि एफएसएल टीमने घटनास्थळाची पाहणी केली आहे. आतापर्यंत कुठलाही गैरप्रकार झाल्याची भीती नसून पुढील तपास सुरू आहे. दिल्लीपोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मुलगा मानसिकदृष्ट्या अस्वस्थ होता. गेल्या सप्टेंबरपासून त्याच्यावर उपचार सुरू होते.

विशेष म्हणजे आजकाल अनेक छोट्या-मोठ्या कारणांमुळे तरुणांनी असे पाऊल उचलल्याच्या घटना समोर येत आहेत. नुकतेच अकरावीत शिकणाऱ्या एका मुलीने आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. हे प्रकरण चेन्नईच्या बाहेरील भागातील आहे. या मुलीची सुसाईड नोट खूपच भावूक होती. सुसाईड नोटमध्ये त्याने लिहिले होते- 'ना शिक्षकांवर विश्वास ठेवू नका ना नातेवाईकांवर... आता मुलींसाठी फक्त आईचा गर्भ आणि कबर सुरक्षित आहे'. या नोटची सुरुवात 'Stop Sexual Harrasment' या शब्दांनी होते. आता हे सहन होत नाही, असे मुलीने पत्रात लिहिले आहे.

Web Title: IAS officer's son commits suicide; Jumped from the sixth floor

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.