मनोरमा खेडकरांनी घेतलेले इंदूबाई हे नाव कोणाचे; पोलिसांना कशा सापडल्या? धक्कादायक माहिती
By ऑनलाइन लोकमत | Published: July 19, 2024 11:35 AM2024-07-19T11:35:16+5:302024-07-19T11:35:36+5:30
Manorama Khedkar Escape, Arrest Story: शेतकऱ्यांना पिस्तूल दाखवून दमदाटी केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर मनोरमा पुण्यातून थेट महाडला पळून गेल्या होत्या. मोबाईल बंद करून, दुसऱ्याच महिलेची ओळख घेत त्या महाडमधील एका लॉजवर लपल्या होत्या.
आयएएस ट्रेनी अधिकारी पूजा खेडकर हिचे व तिची वादग्रस्त मातोश्री मनोरमा खेडकर यांचे एकेक प्रताप समोर येत आहेत. शेतकऱ्यांना पिस्तूल दाखवून दमदाटी केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर मनोरमा पुण्यातून थेट महाडला पळून गेल्या होत्या. मोबाईल बंद करून, दुसऱ्याच महिलेची ओळख घेत त्या महाडमधील एका लॉजवर लपल्या होत्या. मोबाईल बंद असल्याने त्या पोलिसांना सापडत नव्हत्या, तर इंदूबाई नावाचे आधारकार्ड दाखविल्याने लॉज मालकालाही काही संशय आला नव्हता. या सर्व प्रकाराबाबत महत्वाची माहिती समोर आली आहे.
सगळेच फेक! पूजा खेडकरांनी घरचा पत्ता दिला, तो निघाला बंद पडलेल्या कंपनीचा; रेशन कार्डही बनविले
पोलिसांच्या कारवाईपासून पळ काढण्यासाठी मनोरमा यांनी पलायन केले होते. यासाठी त्यांनी कॅब केली होती. त्या पुण्यातून महाडला गेल्या होत्या. तिथे हिरकणीवाडी येथे पार्वती निवास हॉटेलमध्ये रुम बुक केली. यावेळी त्यांनी प्रवासात कॅब चालक दादासाहेब ढाकणे याच्याकडून अत्यंत धूर्तपणे त्याचे आधारकार्ड मिळविले होते. या आधारकार्डचा गैरवापर करत माहिर असलेल्या मनोरमा यांनी ढाकणेंच्या आईचे नाव इंदूबाई घेतले. या आधारकार्डवरून त्यांनी हॉटेलमध्ये रुम मिळविली.
पोलीस शोध घेत होते, परंतू त्या नाव बदलून राहत असल्याने त्या सापडत नव्हत्या. परंतू, शातिर असलेल्या मनोरमा एक चूक करून बसल्या व पकडल्या गेल्या. पोलिसांनी मनोरमा यांचा फोन सर्व्हिलान्सला लावला होता. १७ जुलैच्या रात्री ११ वाजता मनोरमा यांनी त्यांचा फोन चालू केला आणि पोलिसांना त्यांचे लोकेशन सापडले. यानंतर लगेचच सूत्रे हलली आणि पहाटे साडेतीनलाच पोलीस लॉजच्या दारात हजर झाले.
डॉ. च्या मिस पूजा, २०२० मध्ये ३० वर्षांच्या २०२३ मध्ये ३१; पूजा खेडकरांनी वयातही बनाव केला
दरम्यान, पूजा खेडकर यांनी पुण्याचे जिल्हाधिकारी सुहास दिवसे यांच्यावर छळाचे आरोप केले होते. यासंबंधात तक्रारही दिली होती. यावर कारवाई करण्यासाठी खेडकर यांचे जबाब नोंदवावे लागणार आहेत. पोलिसांनी यासाठी १८ जुलैला पुण्यात हजर राहण्याबाबत खेडकर यांना नोटीस पाठविली होती. त्या न आल्याने वाशिम शहर पोलीस स्टेशनच्या एपीआय श्रीदेवी पाटील तिसऱ्यांदा खेडकर यांच्या वाशिममधील शासकीय निवासस्थानी आल्या होत्या. आता खेडकर यांना २० जुलैला जबाब नोंदविण्यासाठी हजर राहण्याची नोटीस देण्यात आली आहे.