इचलकरंजीतील औषध व्यापाऱ्याला आंबोलीजवळ लुटले
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 14, 2019 14:37 IST2019-05-14T14:25:55+5:302019-05-14T14:37:42+5:30
ही घटना सोमवारी सांयकाळी घडली असून घटने नंतर औषध व्यापाऱ्याला मारहाण करून अपहरण करण्यात आले.

इचलकरंजीतील औषध व्यापाऱ्याला आंबोलीजवळ लुटले
सावंतवाडी - गोव्याहून इचलकरंजीच्या दिशेने जाणाऱ्या औषध व्यापाऱ्याला आंबोली जवळ पोलीस असल्याचे भासवून स्कॉर्पिओ मधून आलेल्या पाच जणांनी लुटल ही घटना सोमवारी सांयकाळी घडली असून घटने नंतर औषध व्यापाऱ्याला मारहाण करून अपहरण करण्यात आले. तसेच त्याला आपल्या कारमध्ये बसवून बेळगावच्या दिशेने नेण्यात आले तेथे पुन्हा मारहाण करण्यात आली व त्याला शिनोली जवळच्या जंगलात सोडून देण्यात आले या औषध व्यापाराच्या जवळ असलेले दोन लाख रुपयांची रोकड तसेच दागिने ही या बनावट पोलिसांनी लुटून नेले या घटनेने आंबोली परिसरात खळबळ माजली असून मंगळवारी सकाळी औषध व्यापाऱ्याला पोलिसांनी शिनोळी येथून नातेवाईकांच्या वतीने सावंतवाडी करण्यात आले आहे पोलीस व्यापाऱ्याचा तक्रार नोंदवत आहेत गोव्याहून इचलकरंजीच्या दिशेने जात असताना व्यापाऱ्यांसोबत दोन ते तीन मित्र होते ते व्यवस्थित असून तपासात त्यांची मदत होईल असे पोलिसांनी सांगितले.