तुळजापुरातील बसस्टँडवर ओळख; लातूरमध्ये अत्याचार! संशयित शिक्षकासह तिघांविरुद्ध गुन्हा
By राजकुमार जोंधळे | Updated: September 21, 2024 22:23 IST2024-09-21T22:22:04+5:302024-09-21T22:23:38+5:30
काेळपा परिसरातील एका लाॅजवर नेऊन अत्याचार केल्याचे पीडित महिलेने पाेलिसांना सांगितले

तुळजापुरातील बसस्टँडवर ओळख; लातूरमध्ये अत्याचार! संशयित शिक्षकासह तिघांविरुद्ध गुन्हा
राजकुमार जाेंधळे, लातूर: प्रवासादरम्यान तुळजापूर बसस्थानकात ओळख झालेल्या महिलेवर लातुरातील नांदेड राेडवर असलेल्या एका लाॅजवर अत्याचार केल्याची घटना समाेर आली आहे. याबाबत पीडित महिलेच्या तक्रारीवरुन शिवाजीनगर पाेलिस ठाण्यात संशयीत शिक्षकासह इतर तिघांविराेधात गुन्हा दाखल केला आहे.
पाेलिसांनी सांगितले, धाराशिव जिल्ह्यातील तुळजापूर बसस्थानक येथे काही दिवसांपूर्वी तुळजापुरातील एका महिलेची एका संशयीत शिक्षकासाेबत ओळख झाली. दरम्यान, पीडित महिलेने बाेताना माझ्यासाठी काही काम आहे का? अशी विचारणा केली असता, शिक्षकाने १५ सप्टेंबर राेजी फाेन करुन, लातुरात १६ सप्टेंबर राेजी बाेलावून घेतले. पीडित महिला लातुरात दाखल झाल्यानंतर त्या शिक्षकाने अगाेदरच चालकासह इतर दाेघे जण बसलेल्या कारमध्ये पीडित महिलेसह स्वत: कारमध्ये बसण्यास सांगितले. ती कार नांदेड राेडवर पाेहचली. रस्त्यालगत थांबविलेल्या कारमधील चाैघांपैकी दाेघांनी कारमध्येच विनयभंग करुन, अत्याचार केले. त्यानंतर काेळपा परिसरातील एका लाॅजवर नेऊन अत्याचार केल्याचे पीडित महिलेने पाेलिसांना सांगितले.
याबाबत शिवाजीनगर पाेलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, ताे विवेकानंद चाैक पाेलिस ठाण्याकडे वर्ग करण्यात आला आहे.