‘इन्स्टा’वरून ओळख केली, अल्पवयीन मुलगी पळवली; आरोपीस नाशकातून बेड्या
By चैतन्य जोशी | Published: March 12, 2024 06:37 PM2024-03-12T18:37:01+5:302024-03-12T18:38:01+5:30
सेलू पोलिसांची कारवाई
चैतन्य जोशी, वर्धा: अल्पवयीन मुलीस अज्ञाताने फूस लावून पळवून नेले होते. ही घटना २१ फेब्रुवारी रोजी घडली होती. याप्रकरणी सेलू पोलिसांनी कसाेशिने तपास करीत आरोपीस नाशिक येथून ताब्यात घेत बेड्या ठोकल्या तर मुलीला सुरक्षितरित्या तिच्या पालकांच्या स्वाधीन केले.
किरण उर्फ सन्नी विष्णू पगारे (२१ रा. सामनगांव राजवाडा चौक नाशिक) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे.
१७ वर्षीय मुलगी पेपरला जातो असे सांगून शाळेत गेली होती. तिला अज्ञाताने फूस लावून पळविल्याची तक्रार सेलू पोलिसात दाखल करण्यात आली होती. पोलिसांनी मुलीचे नातेवाईक, शाळेतील शिक्षक, मित्र मैत्रीणींची सखोल विचारपूस केली असता त्यामध्ये एक ‘सन्नी’ नामक व्यक्ती हा ‘नाशीक’ मुलीला भेटायला याचा अशी माहिती मिळाली.
या माहितीच्या आधारे तपास पथक नाशिक येथे रवाना झाले. खबरी आणि तांत्रीक माहितीच्या आधारे पोलिसांनी आरोपी किरण उर्फ सन्नीचा शोध घेत त्यास अटक करुन अल्पवयीन मुलीची सुटका केली. तपासात आरोपीची ओळख मुलीशी इन्स्टाग्रामवरुन झाल्याचे निश्पन्न झाले. पोलिसांनी ११ रोजी सन्नीला अटक करुन मुलीला पालकांच्या स्वाधीन केले.
ही कारवाई पोलिस निरीक्षक तिरुपती राणे यांच्या मार्गदर्शनात पोलिस उपनिरीक्षक प्रवीण भोयर, अखिलेश गव्हाणे, सचीन वाटखेडे, रुख्साना शेख यांनी केली.