मला नाही तर तपासाला क्वारंटाईन केलं होतं, क्वारंटाईनमधून सुटका झालेल्या विनय तिवारी यांची प्रतिक्रिया
By ऑनलाइन लोकमत | Published: August 7, 2020 05:18 PM2020-08-07T17:18:53+5:302020-08-07T17:19:40+5:30
सीबीआयने सुद्धा तपास हाती घेत ६ ऑगस्ट २०२० रोजी एकूण सहा जणांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.
अभिनेता सुशांत सिंग राजपूत मृत्यू प्रकरणाचा तपास करण्यासाठी बिहारमधील पाटणा शहराचे पोलीस अधिक्षक विनय तिवारी मुंबईत आले होते. मुंबईत आल्यावर एसपी विनय तिवारी यांना मुंबई पालिकेने क्वारंटाईन केलं होतं. अखेर एसपी विनय तिवारी यांची पालिकेने क्वारंटाईनमधून सुटका केली आहे. पोलीस अधिक्षकांनाच मुंबईत क्वारंटाईन केल्याने चांगलाच वाद निर्माण झाला होता. यावरून सुप्रीम कोर्टाने राज्य सरकारला यातून चांगला मेसेज जात नसल्याचं म्हणून झापले होते.
सुटका झाल्यानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना विनय तिवारी यांनी सांगितले की, मला नाही तर तपासाला क्वारंटाईन करण्यात आलं होतं अशी टीका केली. सुशांतच्या वडिलांनी पाटणा येथे पोलीस तक्रार केल्यानंतर बिहारपोलिसांचं पथक तपासासाठी मुंबईत दाखल झालं होतं. विनय तिवारी यांच्या नेतृत्वाखाली तपास करण्यासाठी पथक दाखल झालं होतं. पण मुंबईत पोहोचल्यानंतर त्यांना क्वारंटाईन करण्यात आल्याने बिहार आणि महाराष्ट्र सरकारमध्ये वाद निर्माण झाला होता. मला नाही तर तपासाला क्वारंटाईन केलं होतं असं मी म्हणेन. बिहार पोलीस तपास करत होते. मला क्वारंटाईन केल्यामुळे त्यात अडथळा निर्माण झाला. ज्या वेगाने तपास करण्यासाठी आम्ही आलो होतो तो करु शकलो नाही, अशी प्रतिक्रिया विनय तिवारी माध्यमांशी बोलताना दिली आहे.
या क्वारंटाईन केल्यानंतर पालिका आयुक्तांना बिहार पोलीस अधिकाऱ्यांनी पत्र लिहून विनय तिवारी यांची सुटका कारण्यासाठी विनंती केली होती. तसेच याबाबत कायदेशीर मार्गाने पुढचं पाऊल उचलू असं देखील त्यांनी म्हटलं होतं. सुशांत आत्महत्या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे देण्याची शिफारस बिहार पोलिसांनी केंद्र सरकारकडे केली होती. त्यानंतर केंद्र सरकारने ही शिफारस मान्य करत सीबीआयकडे तपास देण्यास मान्यता दिली. यानंतर सीबीआयने सुद्धा तपास हाती घेत ६ ऑगस्ट २०२० रोजी एकूण सहा जणांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.
Bihar IPS officer #VinayTiwari, who was quarantined in Mumbai, to leave for Patna today. Four other officers had returned to Patna yesterday.
— ANI (@ANI) August 7, 2020
BMC has informed me, through a text message, that I can go out of quarantine. I'll be leaving for Patna now: Vinay Tiwari (in file pic) pic.twitter.com/Uk94aEy0Oy
अन्य महत्वाच्या बातम्या...
...चांगला मेसेज गेला नाही; बिहार पोलीस अधिकाऱ्याला क्वारंटाईन केल्याबद्दल SC ने कान खेचले!
Disha Salian Case: नारायण राणेंच्या गंभीर आरोपानंतर पोलिसांचं पुराव्यांसाठी आवाहन
खळबळजनक! कारागृहात कैद्याने गळफास लावून केली आत्महत्या
सुशांत राजपूत प्रकरणाच्या तपासासाठी मुंबईत आलेले बिहारचे पोलीस परतले; १२ जणांची केली चौकशी
डॉक्टर की हैवान! भिवंडीत अल्पवयीन मुलीवर डॉक्टरने केला लैंगिक अत्याचार
बापरे! आजी आजोबांनी केले अश्लील चाळे अन् लावले अल्पवयीन मुलीला जबदस्तीने बघायला