पोलिसांनी चुकून चलान कापलं तर ते असं करा रद्द, दंड नाही लागणार भरावा

By ऑनलाइन लोकमत | Published: July 29, 2022 04:53 PM2022-07-29T16:53:24+5:302022-07-29T16:55:14+5:30

Traffic Police : वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांना सध्याच्या मोटार वाहन कायद्यानुसार शिक्षा केली जाते. दंड आकारण्यापासून तुरुंगात पाठवण्याची तरतूद आहे.

If the police cut the challan by mistake, cancel it, no penalty will be paid | पोलिसांनी चुकून चलान कापलं तर ते असं करा रद्द, दंड नाही लागणार भरावा

पोलिसांनी चुकून चलान कापलं तर ते असं करा रद्द, दंड नाही लागणार भरावा

Next

चुका कोणाकडूनही होऊ शकतात, पण जेव्हा तुम्ही वाहनाने रस्त्यावरून प्रवास करत असाल, तेव्हा चुकांची व्याप्ती कमी करायला हवी. वाहतुकीचे सर्व नियम पूर्णपणे पाळले तरच हे घडेल. लोक वाहतुकीचे नियम पाळतात का याकडे केंद्र सरकार आणि सर्व राज्यांची सरकारही पूर्ण लक्ष देत आहेत. यासाठी कठोर कायदेही करण्यात आले आहेत. वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांना सध्याच्या मोटार वाहन कायद्यानुसार शिक्षा केली जाते. दंड आकारण्यापासून तुरुंगात पाठवण्याची तरतूद आहे.
 

वाहतूक नियमांचे उल्लंघन केल्याबद्दल सामान्यतः लोकांना दंड आकारला जातो. पण, याचा अर्थ असा नाही की, त्यांना तुरुंगात टाकता येणार नाही. असे अनेक वाहतूक नियम आहेत, ज्यांचे उल्लंघन केल्यास तुरुंगवास भोगावा लागतो. त्यामुळे प्रत्येकाने वाहतुकीचे नियम पाळले पाहिजेत. पण, इथे आणखी एक मुद्दा येतो की, ज्याप्रमाणे इतर कोणत्याही व्यक्तीची चूक असू शकते, तशीच चूक वाहतूक पोलिसांचीही असू शकते. जर समजा वाहतूक पोलिसांनी चुकून तुमचे चलान कापले असेल तर त्याचा अर्थ असा नाही की, आता तुम्हाला त्या चलानचा दंड भरावा लागेल.

यामध्ये अशीही तरतूद आहे की, जर एखाद्या वाहतूक पोलिसाने चुकून तुमचे चलान कापले आणि तुम्ही वाहतुकीच्या कोणत्याही नियमाचे उल्लंघन केले नाही असे तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही त्यासाठी संबंधित विभागाशी संपर्क साधू शकता. तुम्ही वाहतूक पोलिस विभागाच्या उच्च अधिकाऱ्यांकडे तक्रार करू शकता आणि सांगू शकता की, तुम्ही वाहतूक नियमाचे उल्लंघन केले नाही, तुमचे चलान चुकीच्या पद्धतीने कापले गेले आहे. जर त्यांना तुमची तक्रार योग्य वाटली तर तुमचे चलान रद्द केले जाईल. तुम्ही तुमच्या शहरातील वाहतूक पोलीस विभागाच्या कार्यालयात जाऊन हे करू शकता. याशिवाय तुमचे चलान रद्द झाले नाही तरी तुम्ही चालानला न्यायालयात आव्हान देऊ शकता.

Web Title: If the police cut the challan by mistake, cancel it, no penalty will be paid

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.