तू माझी नाही तर तुला मी कोणाचीही होऊ देणार नाही, असं म्हणत विवाहित प्रियकराने मोडला प्रेयसीचा विवाह

By ऑनलाइन लोकमत | Published: October 11, 2021 10:04 PM2021-10-11T22:04:01+5:302021-10-11T22:11:07+5:30

Crime News in Pune : पुण्यातील धक्कादायक प्रकार

If you are not mine, I will not let you be anyone's, says a married lover and disturb girlfriend's marriage | तू माझी नाही तर तुला मी कोणाचीही होऊ देणार नाही, असं म्हणत विवाहित प्रियकराने मोडला प्रेयसीचा विवाह

तू माझी नाही तर तुला मी कोणाचीही होऊ देणार नाही, असं म्हणत विवाहित प्रियकराने मोडला प्रेयसीचा विवाह

googlenewsNext
ठळक मुद्देहवेली पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रशांत व पिडीत तरूणीची फेसबुकवरून ओळख झाली होती.

धायरी : प्रियसीच्या जातीवरून कुटूंबियांनी विरोध केल्यानंतर प्रियकराने दुसऱ्या मुलीशी विवाह केला. पण, त्यानंतरही प्रियकर प्रियसीला त्रास देत “तु माझी आहेस, तुला मी कोणाचीही होऊ देणार नाही” असे म्हणत दम भरत होता. त्याने प्रियसीचा ठरलेला विवाह देखील मोडला असल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी प्रशांत दिलीप हागवणे (रा. नांदोशी रोड, किरकटवाडी, ता. हवेली, पुणे) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत २१ वर्षीय तरूणीने हवेली पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.
 
हवेली पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रशांत व पिडीत तरूणीची फेसबुकवरून ओळख झाली होती. ओळखीचे रूपांतर मैत्रित झाले व मैत्रीचे रूपांतर प्रेमात. त्यानंतर गेली तीन ते चार वर्ष दोघेही प्रेमात होते. त्यांना विवाह देखील करायचा होता. तरूणीच्या कुटूंबाने विवाहाला परवानगी दिली होती. मात्र, प्रशांतच्या कुटूंबाचा या विवाहाला विरोध होता.  हा विरोध होता. त्यातच तरूणी खालच्या जातीची असल्याने प्रशांतने कुटूंबाच्या सांगण्यावरून दुसऱ्या मुलीशी विवाह केला. त्यानंतर या तरूणीने प्रशांतची संपर्क बंद केला. परंतु, काही दिवसांनी पुन्हा प्रशांतने पिडीत तरूणीशी संपर्क साधण्यास सुरूवात केली.

तिला दुसऱ्या क्रमांकावरून सतत फोन करून त्रास दिला. तसेच, इन्स्टाग्रामवर “तु मला हवी आहेस, तु माझी नाही तर तुला मी कोणाचीही होऊ देणार नाही. मला नाही सहन होणार तु कोणाची झालेली. मला तुझ्यासोबत लग्न करायचे असून, आत्ताच कागदपत्रे घेऊन ये, असे मेसेज त्याने केले. मला सोडून तू दुसऱ्याशी लग्न केल्यास तुझ्यासह तुझ्या आई - वडिलांना मारून टाकण्याची धमकीही त्याने दिली. तसेच, तरूणीचा हडपसरमधील एका तरूणाशी विवाह ठरला होता. त्या तरूणाची भेट घेऊन हा विवाह देखील प्रशांत याने मोडून तरूणीला त्रास दिला असल्याची माहिती हवेली पोलिसांनी दिली. या सततच्या त्रासाला कंटाळून तरूणीने पोलीसांकडे धाव घेऊन तक्रार दिली आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक ऋतुजा मोहिते या करत आहेत.

Web Title: If you are not mine, I will not let you be anyone's, says a married lover and disturb girlfriend's marriage

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.