जर तुम्ही सरकारबरोबर संघर्ष केला तर बदला घेतील, पाठिंबा दिलात तर गुडघे टेकतील 

By ऑनलाइन लोकमत | Published: April 17, 2020 10:27 PM2020-04-17T22:27:18+5:302020-04-17T22:30:49+5:30

मौलाना साद यांचा नवीन ऑडिओ 

If you clash with the government, revenge will be averted, if you support, they will knees will fall in front of you pda | जर तुम्ही सरकारबरोबर संघर्ष केला तर बदला घेतील, पाठिंबा दिलात तर गुडघे टेकतील 

जर तुम्ही सरकारबरोबर संघर्ष केला तर बदला घेतील, पाठिंबा दिलात तर गुडघे टेकतील 

Next
ठळक मुद्दे दिल्ली पोलिसांनी जमातचे मौलाना मोहम्मद साद यांच्यासह अनेक जणांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला आहे. आपल्या अनुयायांना पुढे आणण्यासाठी प्रोत्साहित करणे हे शासकाचे कार्य आहे.

तबलीगी जमातचे आणि मरकजचे प्रमुख मौलाना मोहम्मद साद यांनी एक नवीन ऑडिओ जारी केला आहे. या ऑडिओमध्ये साद सांगत आहेत की, संयम बाळगणे खूप महत्वाचे आहे. केवळ धैर्यानेच आपण आपल्या समस्येवर समाधान प्राप्त करू शकता. समस्या दोन प्रकारच्या असतात, पहिले तुमच्या आत आणि दुसरे बाहेरचे. 

 

आपल्या अनुयायांना पुढे आणण्यासाठी प्रोत्साहित करणे हे शासकाचे कार्य आहे. परंतु ते स्पर्धेबाबत बोलत आहेत, यामुळे दरी वाढेल. इस्लामच्या मते, सरकार लोकांच्या हक्कांवर दडपण आणत आहे. ही पद्धत योग्य नाही. कारण जर आपण त्यांच्याशी संघर्ष केला तर त्यांना वाटते की आपण त्यांच्यावर सूड घेत आहात आणि जर आपण त्यांचे समर्थन केले तर त्यांना वाटतं आपण त्यांच्यासमोर गुडघे टेकले आहेत.


गेल्या महिन्यात दिल्लीच्या निजामुद्दीन भागात असलेल्या मरकजमध्ये तबलिगी जमातचा एक कार्यक्रम झाला. या कार्यक्रमात सहभागी जमातमधील बऱ्याच लोकांना कोरोनाची लागण झाल्याचे आढळले. त्याच वेळी, जेथे जमातचे लोक परत गेले, तेथे संपर्कामुळे इतर बरेच लोक देखील या संसर्गाचा बळी पडले. यानंतर, देशात कोरोना रुग्णांची संख्या वेगाने वाढू लागली.


दिल्लीपोलिसांनी जमातचे मौलाना मोहम्मद साद यांच्यासह अनेक जणांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला आहे. जमातमध्ये सामील झालेल्या 1890 परदेशी नागरिकांविरूद्ध लुकआउट नोटीस बजावण्यात आली आहे. पोलिसांचे म्हणणे आहे की, या लोकांनी व्हिसा नियमांचे उल्लंघन केले आणि कार्यक्रमात हजेरी लावली. पोलिसांनी मरकज येथून 500 हून अधिक परदेशी लोकांसह 2300 हून अधिक लोकांना बाहेर काढले होते.

 

या व्यतिरिक्त गुन्हे शाखेने मरकजशी संबंधित 18 लोकांना नोटीस बजावली असून तपासात सहभागी होण्यास सांगितले आहे. पोलिसांनी मौलाना साद यांच्यासह 18 जणांना चौकशीत सहभागी होण्यासाठी नोटीस बजावली आहे. मात्र, यापैकी 11 जण क्वारंटाईन असल्याचे सांगून पोलिसांसमोर येण्यास टाळत आहेत. मौलाना साद यांनीही स्वत: ला क्वारंटाईन ठेवले आहे.मात्र, मौलाना यांचा क्वारंटाईनचा कालावधी संपला असून पोलिस त्यांना कोणत्याही क्षणी अटक करू शकतात.



त्याचबरोबर ईडीने (अंमलबजावणी संचालनालयाने) मौलाना साद यांच्याविरोधात मनी लाँड्रिंग प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा देखील दाखल केला आहे. ईडीला असा संशय आहे की, मौलाना साद यांच्या संस्थेला परदेशातून मोठ्या प्रमाणात पैसे आले आहेत आणि सरकारी अधिकाऱ्यांसमोर ते उघड केले गेले नाही. ईडीने मौलाना साद यांच्या 8 साथीदारांवरही गुन्हा दाखल केला आहे. मरकज ट्रस्टच्या लेजर खात्याचा शोध घेण्यात येत असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. धर्मादाय संस्थेला मिळालेला पैसा अडचणीत आला का आणि हवालासाठी वापरला गेला आहे की नाही याचीही ईडी चौकशी करेल. संभाव्य उत्पन्न जाहीर न करणे, विश्वस्तांकडून कर चुकवणे आणि वैयक्तिक लाभासाठी निधी जमा करणे यासारख्या आरोपांवर चौकशी सुरू केली आहे.

मरकजच्या निधीसंदर्भात दिल्ली पोलिसांच्या गुन्हे शाखेचा अहवाल केंद्रीय आर्थिक अन्वेषण यंत्रणांना - अंमलबजावणी संचालनालय आणि प्राप्तिकर विभागाला सादर केला जाईल. मौलाना साद यांना चौकशीसाठी गुन्हे शाखेकडे हजेरी लावावी लागेल.

आज तकला मिळालेल्या माहितीनुसार, गुन्हे शाखेचा अहवाल आणि साद यांचे वक्तव्य (ऑडिओ) तपास यंत्रणेकडून तपासासाठी वापरला जाईल. सूत्रांच्या माहितीनुसार, प्राथमिक तपासात अलीकडच्या काळात त्याच्या बँक खात्यात मोठ्या प्रमाणात पैसे आल्याची माहिती समोर आली आहे. 

Web Title: If you clash with the government, revenge will be averted, if you support, they will knees will fall in front of you pda

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.