विवाहबाह्य संबंध ठेवाल तर याल गोत्यात! कुठे फाशी तर कुठे चाबकाचे फटके
By ऑनलाइन लोकमत | Published: December 15, 2022 06:34 AM2022-12-15T06:34:30+5:302022-12-15T06:34:48+5:30
विवाहबाह्य संबंधांवर नव्याने चर्चा सुरू झाली आहे. याचे कारण म्हणजे इंडाेनेशियाने नुकतेच कायदा करून अशा संबंधांना गुन्हेगारी श्रेणीत टाकले आहे.
विवाहबाह्य संबंधांवर नव्याने चर्चा सुरू झाली आहे. याचे कारण म्हणजे इंडाेनेशियाने नुकतेच कायदा करून अशा संबंधांना गुन्हेगारी श्रेणीत टाकले आहे. तेथील जनतेसाेबतच पाश्चिमात्य देशांनी यावर आक्षेप घ्यायला सुरुवात केली आहे. मात्र, असा कायदा करणारा इंडाेनेशिया हा एकमेव देश नाही. २४ देशांत विवाहबाह्य संबंध ठेवणे गुन्हा आहे.
२०१८ मध्ये सर्वाेच्च न्यायालयाच्या आदेशानंतर अशा संबंधांना गुन्हेगारी श्रेणीतून काढण्यात आले. आता हा गुन्हा नाही, मात्र घटस्फाेटासाठी आधार ठरू शकताे.
येथे विवाहबाह्य संबंध गुन्हा
अफगाणिस्तान । इजिप्त । अल्जेरिया । बेनिन । इथियाेपिया । बांगलादेश । इराण । लाओस । बुर्किना फासाे । मालदीव । कांगाे । माेराेक्काे । पाकिस्तान । साैदी अरब । सुदान । फिलिपीन्स । सेनेगल । कतार । रवांडा । तैवान । ट्युनिशिया । व्हिएतनाम । इंडाेनेशिया । साेमालिया
शिक्षा काय?
इजिप्त : पत्नीला २ वर्ष, पतीला ६ महिने तुरुंगवास.
पाकिस्तान : १० वर्षांचा तुरुंगवास
इराण : भर चाैकात फाशी
साैदी अरब, अफगाणिस्तान, साेमालियामध्ये दाेषीला चाैकात बांधण्यात येते. त्यानंतर लाेक त्यांना दगड मारतात किंवा जल्लाद चाबकाचे फटके देताे. अनेकदा दाेषीचा मृत्यू हाेताे.
अमेरिकेत ५० पैकी
२१ राज्यांत आहे गुन्हा
लाेकांना विवाहबाह्य संबंध सहन हाेत नाही. मात्र, काेणताही कायदा याविरोधात नाही.
फ्रान्स
५२%
लाेकांना असे संबंध मान्य किंवा त्यांना काहीही फरक पडत नाही. फ्रान्स सरकार तरुणांसाठी माेफत गर्भनिराेधक वाटणार आहे.
५०
पैकी ४८ देशांमध्ये ६० टक्क्यांहून अधिक लाेकांना विवाहबाह्य संबंध मान्य नाहीत, असे सर्वेक्षणात आढळले आहे.