Video - "वहिनी फक्त १० दिवस सासरच्या घरी राहिली आणि आमचं संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त केलं"

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 9, 2025 19:51 IST2025-01-09T19:49:02+5:302025-01-09T19:51:07+5:30

सासरच्या घरात फक्त १० दिवस राहिलेल्या एका महिलेने संपूर्ण कुटुंब कसं उद्ध्वस्त करायला सुरुवात केली हे सांगितलं आहे. 

iit iim graduate alleges her brother 10 day arranged marriage ended in fake domestic violence fir | Video - "वहिनी फक्त १० दिवस सासरच्या घरी राहिली आणि आमचं संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त केलं"

Video - "वहिनी फक्त १० दिवस सासरच्या घरी राहिली आणि आमचं संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त केलं"

अतुल सुभाष आत्महत्या प्रकरणाने संपूर्ण देशाला हादरवून टाकलं. पत्नी आणि सासरच्या लोकांमुळे त्रासलेल्या अतुलने आत्महत्येआधी एक व्हिडीओ शूट केला, ज्यामध्ये त्याने व्यवस्थेतील कमतरता पूर्णपणे उघड केल्या. कदाचित अतुलच्या मृत्यूने काहीतरी बदलेल असं म्हटलं जात होतं. पण आता महिन्याभरातच आणखी एक व्हि़डीओ व्हायरल होत आहे. सासरच्या घरात फक्त १० दिवस राहिलेल्या एका महिलेने संपूर्ण कुटुंब कसं उद्ध्वस्त करायला सुरुवात केली हे सांगितलं आहे. 

टाईम्स ऑफ इंडियामध्ये प्रकाशित झालेल्या रिपोर्टनुसार, IIM अहमदाबादची पदवीधर प्रत्युषा चल्ला हिने भावाच्या लग्नानंतर तिच्या वहिनीने कुटुंबासोबत केलेला धक्कादायक प्रकार सांगितला आहे. तिचा व्हिडीओ आता जोरदार व्हायरल झाला आहे. ट्विटरवर असलेला हा व्हिडीओ आतापर्यंत २.८ मिलियनहून अधिक लोकांनी पाहिला आहे. 

बंगळुरूमधील अतुल सुभाषच्या आत्महत्येनंतर लोकांनी संताप व्यक्त केला होता. तसेच पुरुषांवरील घरगुती हिंसाचाराबद्दल पुन्हा चर्चा सुरू झाली आहे. व्हिडीओमध्ये प्रत्युषाने सांगितलं की, "हैदराबादमधील एका अभियांत्रिकी महाविद्यालयात सहाय्यक प्राध्यापक असलेल्या त्याच्या भावाने २०१९ मध्ये राजमुंदरी येथील एका महिलेशी लग्न केलं. हे लग्न फक्त १० दिवस टिकलं." 

"ती माझ्या आईवडिलांशी गैरवर्तन करायची, अपशब्द वापरायचे आणि माझ्या भावाला तिच्या बेडरूममध्ये येऊ देत नव्हती. ती अनेकदा आत्महत्या करण्याची धमकी देत ​​होती. यावरून वहिनी, तिची बहीण, तिचा भाऊ आणि प्रियकर यांनी माझ्या भावाविरुद्ध हा प्लॅन केला होता हे सिद्ध होतं. तिच्या बहिणीने देखील तिच्या सासरच्या लोकांसोबत असंच केलं. यामुळे माझ्या आई-वडिलांची तब्येत बिघडली. आमच्या विरोधात एफआयआर दाखल केली. आमचं कुटुंब उद्ध्वस्त झालं आहे."

Web Title: iit iim graduate alleges her brother 10 day arranged marriage ended in fake domestic violence fir

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.