धूम-धडाक्यात सुरू होतं लग्न, तेव्हाच मंडपात तरूणाची पहिली पत्नी पोहोचली; मग झालं असं काही....
By ऑनलाइन लोकमत | Published: May 26, 2021 05:17 PM2021-05-26T17:17:45+5:302021-05-26T17:21:32+5:30
पोलीस आणि झालेला गोंधळ पाहून लग्नात धावपळ झाली. पीडितेच्या तक्रारीवरून पोलीस नवरदेवाला पकडून घेऊन गेले. सध्या पोलीस या प्रकरणाची चौकशी करत आहे.
उत्तर प्रदेशच्या पीलीभीत जिल्ह्यात एका तरूणाच्या दुसऱ्या लग्नावेळी त्याची पहिली पत्नी पोलिसांना घेऊन पोहोचली आणि लग्नात एकच गोंधळ उडाला. पोलीस आणि झालेला गोंधळ पाहून लग्नात धावपळ झाली. पीडितेच्या तक्रारीवरून पोलीस नवरदेवाला पकडून घेऊन गेले. सध्या पोलीस या प्रकरणाची चौकशी करत आहे.
पूरनपूरचे प्रभारी हरीश बर्धन यांच्यानुसार, बरेली जनपदची सुमन देवीने पोलिसात तक्रार देत सांगितलं की, २८ नोव्हेंबर २०१२ मध्ये तिचं लग्न शाहजहांपूरच्या आशीष वर्मासोबत झालं होतं. सुमन देवीनुसार लग्नाच्या काही महिन्यांनंतर पती आणि सासरचे लोक कमी हुंडा आणला म्हणून तिला टोमणे मारत होते आणि पैशांची मागणी करत होते. यावरून सासरच्या लोकांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. हे प्रकरण कोर्टात सुरू आहे. (हे पण वाचा : लग्नाच्या दिवशीच गायब झाला नवरदेव, तिचं दुसऱ्याशी लग्न झाल्यावर परतला आणि अजब सत्य आलं समोर)
बर्धन यांनी सांगितलं की, यादरम्यान पीडितेला माहिती मिळाली की, सोमवारी तिच्या पतीचं पूरनपूर भागातील मंगलम लग्न मंडपात पीलीभीत जनपदच्या मुलीसोबत लग्न आहे. तेव्हा तिने पूरनपूर पोलीस स्टेशनमध्ये जाऊन तक्रार दिली आणि पोलिसांना घेऊन लग्न मंडपात पोहोचली.
पोलिसात दिलेल्या तक्रारीत पीडिता म्हणाली होती की, तिचा तिच्या पतीसोबत अजून घटस्फोट झालेला नाही. ना कोणत्याही प्रकारचा न्याय निवाडा झालाय. तिच्याकडून ठोकण्यात आलेली केस कोर्टात सुरू आहे. त्यावर निर्णय येणं बाकी आहे. अशात नियमाच्या विरूद्ध तिचा पती दुसरं लग्न करत होता. (हे पण वाचा : एकाच दिवशी, एकाच मुहूर्तावर तरूणाचं दोन बहिणींशी लग्न, नवरदेवाला अटक; समोर आला मोठा ट्विस्ट...)
पोलीस नवरदेवाला पोलीस स्टेशनमध्ये घेऊन गेले. तिथे आरोपीची चौकशी केली गेली. प्रभारी हरीश वर्धन म्हणाले की, पोलीस पोहोचण्याआधीच लग्न पार पडलं होतं. आता पोलीस प्रकरणाची चौकशी करत आहेत.