भिवंडीत ५८ लाखांचा अवैध केमिकल साठा जप्त ; नारपोली पोलिसांची कारवाई
By ऑनलाइन लोकमत | Published: December 2, 2020 07:18 PM2020-12-02T19:18:01+5:302020-12-02T19:19:07+5:30
Crime News : विशेष म्हणजे दहा दिवसांपूर्वीच याच परिसरात असलेल्या महालक्ष्मी वेअरहाऊस पटवर्धन कंपाउंड येथील गेला नंबर पाच मध्ये छापा मारून १७ लाखांचा अवैध केमिकल साठा जप्त केला होता.
भिवंडी - भिवंडीत अनेक ठिकाणी गोदामांमध्ये अवैध पद्धतीने केमिकलची साठवणूक होत असलेल्याने नागरिकांच्या जीवाला धोका निर्माण झाला असून या व अशा अवैध केमिकल साठ्यांविरोधात पोलीस व महसूल प्रशासनाने कठोर कारवाई करावी अशी नागरिकांची ओरड सुरु असतांनाच नारपोली पोलिसांनी पूर्णा येथील भानू लॉजिस्टिक्स , मंगलाबाई कंपाउंड गाळा नंबर ४ व ५ तसेच महावीर पेपर कटिंग बिल्डिंग येथील रघुनाथ कंपाउंड मधील गाळा नंबर ५ या दोन ठिकाणी केमिकलचा अवैध साठा केला असल्याची खबर नारपोली पोलिसांना लागताच पोलिसांनी याठिकाणी मंगळवारी छापा मारला असता याठिकाणाहून ५८ लाख ४१ हजार ४०० रुपये किंमतीचे ५६७ लोखंडी तर २१७ प्लास्टिकचे ड्रम असे एकूण ७८५ विविध प्रकारचे अत्यंत ज्वलनशील ड्रम मध्ये केमिकलचा अवैध साठा केल्याचे आढळून आल्याने नारपोली पोलिसांनी हा संपूर्ण अवैध केमिकल साठा जप्त करून मालकावर गुन्हा दाखल केला आहे. विशेष म्हणजे दहा दिवसांपूर्वीच याच परिसरात असलेल्या महालक्ष्मी वेअरहाऊस पटवर्धन कंपाउंड येथील गेला नंबर पाच मध्ये छापा मारून १७ लाखांचा अवैध केमिकल साठा जप्त केला होता.
सुरेश सारंग कटारीया ( वय ४३ रा. कासार आली भिवंडी ) असे अवैध केमिकल साठवणूक प्रकरणी गुन्हा दाखल झालेल्या इसमाचे नाव असून त्याने पूर्णता येथील केमिकल साठवणुकीसाठी आवश्यक असलेली कोणतीही शासकीय परवानगी घेतली नसल्याचे चौकशीत निष्पन्न झाले आहे. पुढील तपास पोलीस उप निरीक्षक एस एस भोसले करीत आहेत.