भिवंडीत बेचाळीस लाखांचा अवैध गुटखा जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 27, 2021 06:21 PM2021-10-27T18:21:03+5:302021-10-27T18:28:53+5:30
नदीनाका परिसरात तब्बल ४२ लाख ६४ हजार रुपये किमतीचा गुटखा निजामपुरा पोलिसांनी मंगळवारी जप्त केला आहे.
भिवंडी- शहर परिसरात मोठ्या प्रमाणावर गुटखा विक्री होत असताना त्यावर प्रतिबंध घालण्यासाठी पोलीस व अन्न व औषध प्रशासन कारवाई केली जात असतानाही गुटखा तस्कर मोठ्या प्रमाणावर गुटखा विक्री करीत असल्याचे निजामपूर पोलिसांच्या कारवाईत उघड झाले असून नदीनाका परिसरात तब्बल ४२ लाख ६४ हजार रुपये किमतीचा गुटखा निजामपुरा पोलिसांनी मंगळवारी जप्त केला आहे.
निजामपूरा पोलीस ठाण्यातील सहा पो उप निरी अझर पिर खान यांना गुजरात येथून एक ट्रॅक मध्ये मोठ्या प्रमाणावर गुटखा येणार असल्याची खबर मिळाली असता पोलीस पथकाने नदीनाका येथे सकाळी सापळा लावीत संशयित ट्रक त्या ठिकाणी आला असता पोलिसांनी सदरचा ट्रक थांबून तपासणी केली असता त्यामध्ये मोठया प्रमाणावर विमल पान मसाला व तंबाखूजन्य पदार्थ असल्याचे आढळून आले .या ट्रकचा चालक सद्दाम मेहबुब हुसेन शेख, जिशान अहमद अबुजैद शेख ,मोहमंद इब्राहीम हकीमुद्दीन शेख या तिघांना ताब्यात घेत चौकशी केली असता त्यांनी सदरचा गुटखा विक्री करीता गुजरात वडोदरा येथील मनिष भानुशाली यांचे कडुन घेऊन भिवंडीतील गुलजार शेख यास देण्याकरीता आणला असल्याचे स्पष्ट झाल्याने निजामपुरा पोलिसांनी या पाच जणांविरोधात विविध कलमानुसार गुन्हा दाखल करून तिघांना अटक केली आहे.