मेहुण्याच्या पत्नीसोबत होते भाओजीचे अनैतिक संबंध, सत्य लपवण्यासाठी 30 लाख रूपयांची मागणी आणि मग...

By ऑनलाइन लोकमत | Published: July 14, 2022 11:50 AM2022-07-14T11:50:46+5:302022-07-14T11:51:03+5:30

chhattisgarh Crime News : 19 ऑगस्ट 2021 रोजी विश्वम्बर दयाल राठोड यांनी स्वत:वर गोळी झाडून घेत आत्महत्या केली होती. मृत व्यक्ती रायपूरमध्ये राहत होती. आत्महत्येची सूचना मिळताच सिव्हिल लाइन पोलीस घटनास्थळी पोहोचले.

illegal relationship blackmailer brother in law demanded rs 30 lakhs rape constable suicide-case | मेहुण्याच्या पत्नीसोबत होते भाओजीचे अनैतिक संबंध, सत्य लपवण्यासाठी 30 लाख रूपयांची मागणी आणि मग...

मेहुण्याच्या पत्नीसोबत होते भाओजीचे अनैतिक संबंध, सत्य लपवण्यासाठी 30 लाख रूपयांची मागणी आणि मग...

googlenewsNext

chhattisgarh Crime News : छत्तीसगढच्या रायपूरमधून अनैतिक संबंधाची एक धक्कादायक घटना समोर आली आहे. मेहुण्याच्या पत्नीसोबत अनैतिक संबंध असल्याचा खुलासा झाल्यानंतर ब्लॅकमेलिंगला वैतागून व्हीआयपी ड्यूटीवर असलेल्या कर्मचाऱ्याने स्वत:वर गोळी झाडत आत्महत्या केली. पोलिसांनी आत्महत्येसाठी प्रेरित केल्याप्रकरणी मृत व्यक्तीच्या मेहुण्याची पत्नी आणि सासऱ्याला अटक केली.

उमाशंकर आरोपीने आपली पत्नी आणि वडिलांच्या मदतीने मृत व्यक्तीकडे 30 लाख रूपयांची मागणी केली होती. जेव्हा त्याने 30 लाख रूपये देण्यास नकार दिला तेव्हा मृत व्यक्ती विरोधात महिला आणि तिच्या पतीने पोलिसात तक्रार दाखल केली होती. याप्रकरणी महिला आणि तिच्या सासऱ्यांना अटक करण्यात आली. महिलेचा पती उमाशंकर फरार आहे.

19 ऑगस्ट 2021 रोजी विश्वम्बर दयाल राठोड यांनी स्वत:वर गोळी झाडून घेत आत्महत्या केली होती. मृत व्यक्ती रायपूरमध्ये राहत होती. आत्महत्येची सूचना मिळताच सिव्हिल लाइन पोलीस घटनास्थळी पोहोचले. त्यांनी चौकशी सुरू केली. त्यांना घटनास्थळी एक सुसाइड नोट सापडली होती. यानंतर चौकशी दरम्यान महेश राठोड, शारदा राठोड, रामशंकर राठोड यांनी मृतकाला प्रताडित करून आत्महत्येसाठी प्रेरित केल्याचं समोर आलं. चौकशीतून आढळलं की, आरोपी दबाव टाकून मृत विश्वम्बरकडे 30 लाख रूपयांची मागणी करत होते.

पोलिसांनुसार, आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यानंतर आरोपी फरार झाले. पोलिसांना सूचना मिळाली की, आरोपी ग्वाल्हेर येथे राहत आहेत. तेव्हा पोलिसांनी शारदा राठोड आणि महेश राठोड यांना अटक केली. त्यांची चौकशी केली तेव्हा त्यांनी त्यांचा गुन्हा कबूल केला. 13 जुलैला त्यांना अटक केली गेली. पोलीस याप्रकरणी मुख्य आरोपी महिलेच्या पतीचा शोध घेत आहेत.

Web Title: illegal relationship blackmailer brother in law demanded rs 30 lakhs rape constable suicide-case

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.