झूम कार मधून अवैध मद्याची बेकायदेशीर वाहतूक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 20, 2019 12:36 AM2019-11-20T00:36:43+5:302019-11-20T00:38:05+5:30
राज्य उत्पादन शुल्क विभागाने गडचिरोलीला जाणारे विदेशी मद्य व ब्रिझा वाहन असा रुपये १० लाख ३३ हजार ६०० किमतीचा मुद्देमाल जप्त केला.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : राज्य उत्पादन शुल्क विभागाने गडचिरोलीला जाणारे विदेशी मद्य व ब्रिझा वाहन असा रुपये १० लाख ३३ हजार ६०० किमतीचा मुद्देमाल जप्त केला. यासंदर्भात उत्पादन शुल्क विभागाला मिळालेल्या माहितीनुसार सक्करदरा पोलीस स्टेशनच्या हद्दीत दिघोरी उड्डाण पुलाखाली सापळा रचण्यात आला होता. यावेळी वाहन क्रमांक एम.एच.१४ एच.जी. ५२०९ या वाहनाची झडती घेण्यात आली. यात विदेशी दारूचे ५ बॉक्स आढळून आले. वाहनचालक लखन शामराव पेंदाम (२६) याला ताब्यात घेऊन वाहनासह दारू जप्त करण्यात आली. ही कारवाई विभागीय उपायुक्त मोहन वर्दे व अधीक्षक प्रमोद सोनोने यांच्या आदेशानुसार करण्यात आली. कारवाईत निरीक्षक रावसाहेब कोरे, दुय्यम निरीक्षक दिलीप बडवाईक, प्रशांत येरपुडे, राहुल पवार, नीलेश पांडे, रवी निकाळजे यांचा सहभाग होता.