आलिशान कारमधून दारूची अवैध वाहतूक, लातूरमधील युवक ताब्यात, सहा लाखाचा मुद्देमाल जप्त
By ऑनलाइन लोकमत | Published: March 31, 2023 10:25 AM2023-03-31T10:25:46+5:302023-03-31T10:26:07+5:30
याप्रकरणी प्रशांत सोमनाथ येरकळ (२५, रा. वरवंटी, लातूर) याला ताब्यात घेण्यात आले.
बांदा (सिंधुदुर्ग) : आलिशान कारमधून गोवा बनावटीच्या दारूची अवैध वाहतूक करणाऱ्यावर बांदा पोलिसांनी कारवाई करत कारसह एकूण ६ लाख १८ हजार ८०० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला.
याप्रकरणी प्रशांत सोमनाथ येरकळ (२५, रा. वरवंटी, लातूर) याला ताब्यात घेण्यात आले. ही कारवाई बांदा पोलिस निरीक्षक शामराव काळे, उपनिरीक्षक समीर भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस कॉन्स्टेबल प्रथमेश पोवार यांनी केली.
याबाबत मिळालेली माहिती अशी की, बांदा वाफोली मार्गावर गणेश मंदिर जवळ रस्त्यावर गोव्यातून लातूर येथे जाणाऱ्या होंडा कंपनीची एमएच १४ एफएस ३६६३ ही गाडी तपासणीसाठी थांबवली असता या गाडीत गोवा बनावटीची दारू लपवून ठेवलेली आढळली.
याप्रकरणी कार चालकावर महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम १९४९ क ६५(अ),६५(इ) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.अधिक तपास बांदा पोलिस तेली करत आहेत.