फेसबुकवरील प्रियकरासोबत पळून गेली दोन मुलांची आई असलेली महिला, पती मदतीसाठी पोलिसांच्या दारात
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 20, 2022 15:12 IST2022-01-20T15:08:01+5:302022-01-20T15:12:01+5:30
West Bengal : पोलिसांना महिलेचा अजून काहीच पत्ता लागला नाही. पीडित व्यक्तीने सांगितलं की, त्याला पूर्ण विश्वास आहे की, त्याची पत्नी तिच्या प्रियकरासोबतच पळून गेली आहे.

फेसबुकवरील प्रियकरासोबत पळून गेली दोन मुलांची आई असलेली महिला, पती मदतीसाठी पोलिसांच्या दारात
West Bengal : पश्चिम बंगालच्या हुगलीमधून एका हैराण करणारी घटना समोर आली आहे. इथे अनैतिक संबंधावरून दोन मुलांची आई आपल्या प्रियकरासोबत पळून गेली. ही घटना हुगलीच्या रिसडा भागातील असल्याचं बोललं जात आहे. पीडित पतीने पोलिसात याप्रकरणी तक्रार दाखल केली. त्याने सांगितलं की, त्याची पत्नी फेसबुकवर गेल्या काही महिन्यांपासून एका तरूणासोबत चॅट करत होती. मग अचानक १४ जानेवारीला ६ वर्षाची मुलगी आणि ११ वर्षाचा मुलगा सोडून बेपत्ता झाली.
प्रियकरासोबत पळून गेली दोन मुलांची आई
ही घटना साधारण ७ दिवसांआधी घडली. पण पोलिसांना महिलेचा अजून काहीच पत्ता लागला नाही. पीडित व्यक्तीने सांगितलं की, त्याला पूर्ण विश्वास आहे की, त्याची पत्नी तिच्या प्रियकरासोबतच पळून गेली आहे. महिलेच्या पतीने सांगितलं की १५ वर्षाआधी त्याचं लग्न हुगलीच्या कोननगर भागातील कवितासोबत झालं होतं आणि दोघांमध्ये खूप चांगले संबंध होते. नंतर त्यांना दोन मुलं झाली. जीवन पूर्णपणे ठीक सुरू होतं.
मुलगी रडून बेहाल
काही दिवसांपासून त्याची पत्नी फेसबुकवर फार बिझी राहू लागली होती. पण त्याला जराही या गोष्टीचा संशय आला नाही की, त्याची पत्नी दोन मुलांना सोडून अशी पळून जाईल. पीडित व्यक्तीने पोलिसांना विनंती केली आहे की, लवकरात लवकर त्याच्या पत्नीला शोधून आणा. कारण आई अशी अचानक सोडून गेल्याने ६ वर्षाची मुलगी रडून रडून बेहाल झाली आहे.
तेच पोलिसांनी सांगितलं की, लवकरच महिलेला शोधलं जाईल. सर्विलांसची मदत घेतली जात आहे आणि तिच्या फेसबुक अकाउंटवरही नजर ठेवली जात आहे. जेणेकरून काही पुरावा मिळावा. महिलेला पकडलं जाईल. सध्या परिसरात या घटनेची सगळीकडे चर्चा होत आहे.
हे पण वाचा :
ऑपरेशन थिएटरमध्ये चादरी, पडदे आणि डॉक्टरचे कपडे हिरव्या रंगाचेच का असतात?