Crime News: अनैतिक संबंधांस अडथळा, पत्नीने पतीला शेतात नेले; तोंड, नाक, गळा दाबून ठार मारले

By आशपाक पठाण | Published: November 2, 2022 10:32 PM2022-11-02T22:32:00+5:302022-11-02T22:32:37+5:30

Extra Marital Affairs, Crime News: अनैतिक संबंधात अडसर ठरणाऱ्या पतीचा प्रियकराच्या मदतीने गळा दाबून खून करण्यात आल्याची घटना औसा तालुक्यातील गाडवेवाडी शिवारात बुधवारी घडली. याप्रकरणी किल्लारी पोलीस ठाण्यात पत्नीसह चार जणांवर रात्री गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Impeding an immoral relationship, the wife took the husband to the farm; He was killed by choking his mouth, nose and throat | Crime News: अनैतिक संबंधांस अडथळा, पत्नीने पतीला शेतात नेले; तोंड, नाक, गळा दाबून ठार मारले

Crime News: अनैतिक संबंधांस अडथळा, पत्नीने पतीला शेतात नेले; तोंड, नाक, गळा दाबून ठार मारले

googlenewsNext

- अशफाक पठाण
किल्लारी (जि. लातूर) : अनैतिक संबंधात अडसर ठरणाऱ्या पतीचा प्रियकराच्या मदतीने गळा दाबून खून करण्यात आल्याची घटना औसा तालुक्यातील गाडवेवाडी शिवारात बुधवारी घडली. याप्रकरणी किल्लारी पोलीस ठाण्यात पत्नीसह चार जणांवर रात्री गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी सांगितले, तपसे चिंचोली येथील कमल कुमार बलसुरे (वय २८) हिचे लामजना येथील नातेवाईक मामाचा मुलगा विष्णू शंकर लांडगे या तरुणाशी संबंध होते. या संबंधास पतीचा अडथळा येत असल्यामुळे तिने प्रियकर विष्णू लांडगे व सोबत विजय साहेबराव गवळी, योगेश बळी कांबळे (रा. लामजना, ता. औसा) यांना सोबत घेऊन कट चरला. पती कुमार बळीराम बलसुरे (वय ३५, रा. तपसे चिचोली) याला १ नोव्हेंबर रोजी रात्री मोटारसायकलवर बसवून गाडवेवाडी शिवारात नेले. याठिकाणी त्याचे तोंड, नाक, गळा दाबून खून केला, अशी फिर्याद मयताचा भाऊ भागवत बळीराम बलसुरे यांनी दिली. याप्रकरणी पत्नीसह चार जणांवर किल्लारी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, घटनेची माहिती मिळताच पोलीस उपाधीक्षक पवार, किल्लारी पोलीस ठाण्याचे सपोनि. गायकवाड, पीएसआय राजपूत यांनी भेट देऊन पाहणी केली.

चार तासात गुन्हा उघड...
प्रियकर व त्याच्या काही साथीदारांना सोबत घेऊन पत्नीने पतीचा गळा आवळून खून केल्याची घटना मंगळवारी रात्री घडली. सकाळी ७ वाजण्याच्या सुमारास किल्लारी पोलीस ठाण्याचे बीट जमादार सचिन उस्तुर्गे यांना ही बाब कळली. त्यानंतर किल्लारीचे सपोनि. गायकवाड, उस्तुर्गे, आबा इंगळे, किसन मर्डे हे घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी तपासाची चक्रे गतिमान करीत सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास मयताचे घर गाठले. यावेळी मयताची पत्नी कमल बलसुरे, प्रियकर विष्णू लांडगे यांना ताब्यात घेतले. पोलिसी खाक्या दाखवताच त्यांनी खुनाची कबुली दिल्याचे सपोनि. गायकवाड यांनी सांगितले. मयत कुमार बलसुरे यांना दोन मुले असल्याचे पोलिसांनी सांगितले.

Web Title: Impeding an immoral relationship, the wife took the husband to the farm; He was killed by choking his mouth, nose and throat

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.