७ वर्षांपूर्वी झालेली बेपत्ता; एका कार्यक्रमात अचानक दिसली अन्...; नेमकं प्रकरण काय?, पाहा
By ऑनलाइन लोकमत | Published: December 8, 2022 04:52 PM2022-12-08T16:52:35+5:302022-12-08T16:52:44+5:30
२०१५ साली १५ वर्षे वयाची एक मुलगी बेपत्ता झाल्यावर तिच्या वडिलांनी तक्रार दाखल केली.
लखनऊ: सात वर्षांपूर्वी मृत घोषित केलेली मुलगी जिवंत आहे हे आरोपीच्या आईने तपास करून सिद्ध केले व आपला मुलगा निर्दोष आहे हे सर्वांना दाखवून दिले. या प्रकरणी विष्णू (२५ वर्षे) नावाच्या आरोपीला अटक करण्यात आली होती. ती मुलगी प्रत्यक्षात जिवंत असून ती हाथरस येथे राहाते, अशी माहिती आरोपीच्या आईने आपल्या पद्धतीने तपास करून शोधून काढली.
जिच्या हत्येच्या गुन्ह्यात तरुणाने तुरुंगवास भोगत आहे, त्या मुलीचे लग्न झाले आहे. तसेच तिला दोन मुले आहेत. सदर ती नाव बदलून जगत होती. प्रेमप्रकरणातून तिने हा सर्व प्रकार केल्याची माहिती समोर येत आहे. धक्कादायक बाब म्हणजे सात वर्षांनंतर पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या मुलीच्या हत्येप्रकरणी एक व्यक्ती अजून कारागृहात शिक्षा भोगत आहे.
गोंडा पोलीस स्टेशन हद्दीतील धंतोली गावातील प्रवेश उर्फ पूजा या किशोरवयीन (आता महिला) हिला तिच्या पालकांनी त्यांची मुलगी म्हणून ओळखले आहे. सोमवारी पालकांनी ओळख पटवल्यानंतर पोलिसांनी त्याला सीजेएम न्यायालयात हजर केले. येथे पोलिसांनी प्रवेशचा डीएनए नमुना घेऊन तो पालकांच्या डीएनएशी जुळण्यासाठी अर्ज दाखल केला. एसएसपी कलानिधी यांनी सांगितले की, या प्रकरणाच्या पुढील तपासाचे आदेश देण्यात आले आहेत. अशा प्रकरणांमध्ये, वैज्ञानिक तथ्ये तसेच डीएनए जुळणे आवश्यक आहे, निकालांनुसार कारवाई केली जाईल. जर कोणी पीडित असेल तर योग्य तो अहवाल माननीय न्यायालयाकडे पाठवून न्याय मिळवून दिला जाईल.
असा केला तपास
२०१५ साली १५ वर्षे वयाची एक मुलगी बेपत्ता झाल्यावर तिच्या वडिलांनी तक्रार दाखल केली. त्या मुलीची आग्रा येथे हत्या झाल्याचे त्यांना कळले होते. सापडलेला मृतदेह माझ्याच मुलीचा आहे, असेही त्यांनी सांगितले होते. यात सत्य नव्हते, हे आरोपीच्या आईने घटनेच्या सुमारे सात वर्षानंतर तपास करून सिद्ध केले. ती एका धार्मिक कार्यक्रमाला गेली असताना तिथे तिने या महिलेला शोधून काढले.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"