हातपाय बांधून आई-लेकीची निर्दयी हत्या; संतापलेल्या लोकांनी पोलिसांनाच अडवले

By ऑनलाइन लोकमत | Published: March 11, 2022 11:13 AM2022-03-11T11:13:28+5:302022-03-11T11:13:42+5:30

गुरुवारी संध्याकाळी दोघींचा मृतदेह पोस्टमोर्टमला पाठवला. त्यावेळी लोकांमध्ये संताप निर्माण झाला होता.

In Agra, the wife and daughter of a businessman were murdered with intent to steal | हातपाय बांधून आई-लेकीची निर्दयी हत्या; संतापलेल्या लोकांनी पोलिसांनाच अडवले

हातपाय बांधून आई-लेकीची निर्दयी हत्या; संतापलेल्या लोकांनी पोलिसांनाच अडवले

googlenewsNext

आग्रा – उत्तर प्रदेशातील आग्रा येथे बुधवारी रात्री आई-लेकीच्या दुहेरी हत्येने परिसरात मोठी खळबळ माजली आहे. हातपाय बांधून गळा दाबत अज्ञातांनी महिलांची हत्या केली. घरात लुटमारीच्या उद्देशाने घुसलेल्या चोरांनी कपाटातून २७ लाख रोकड आणि ५० लाखांहून अधिक सोन्याचे दागिने लंपास केले. या घटनेची माहिती मिळताच तात्काळ पोलीस घटनास्थळी पोहचले. हत्या आणि चोरीच्या घटनेचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी ४ चौकशी पथक नेमले आहेत.

पत्नी कुसमादेवी आणि मुलगी सविता, धेवता रात्री झापले असताना १ च्या सुमारास छताच्या मार्गाने ५ दरोडेखोर पहिल्या मजल्यावर पोहचले. त्यावेळी बेडवर झोपलेल्या कुसमा देवी आणि सविताचे हायपाय बांधले आणि आरडाओरड केल्यानं तोंड बंद करत गळा दाबला. त्यात दोघींचा मृत्यू झाला आहे. यावेळी घरात असलेल्या ११ वर्षीय मुलालाही बेदम मारहाण करण्यात आली. चोरीच्या उद्देशाने घरात हत्या करण्यात आली. रात्री घडलेल्या या प्रकारानं परिसरात दहशत माजली आहे. कुसुमा देवी आणि सविता यांच्या हत्येने लोकांमध्ये आक्रोश आहे.

गुरुवारी संध्याकाळी दोघींचा मृतदेह पोस्टमोर्टमला पाठवला. त्यावेळी लोकांमध्ये संताप निर्माण झाला होता. यावेळी परिसरातील लोकांनी पोलिसांनी चहुबाजूने अडकवले होते. लूटमार आणि हत्येचा प्रकार करणाऱ्या आरोपींना लवकरात लवकर पकडा अशी मागणी लोकांनी केली आहे. घटनेच्या तपासासाठी पोलिसांवर लोकांचा दबाव वाढल्यानंतर पोलिसांनी ४ चौकशी पथक नेमले आहेत. सध्या पोलीस आरोपींना जेरबंद करण्यासाठी प्रयत्न करत आहेत.

या प्रकरणी पोलीस म्हणाले की, लवकरच या घटनेतील दोषींना पकडण्यात येईल. लोकांनी शांतता राखावी. पीडित कुटुंबाला न्याय देण्याचा आम्ही पूर्णपणे प्रयत्न करू असं आश्वासन त्यांनी दिले. परंतु या घटनेमुळे परिसरात ४५ मिनिटांसाठी वाहतूक व्यवस्था ठप्प झाली होती. कल्याण सागरमध्ये झालेल्या कुसुमा देवी आणि सविता यांच्या मृत्यूनं व्यावसायिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. गुरुवारी ज्यांना या घटनेची माहिती मिळाली त्यांनी उमेश पॅगोरिया यांच्या घराकडे धाव घेतली. शोकात बुडालेल्या कुटुंबाला धीर देण्याचा प्रयत्न केला. या घटनेनंतर परिसरात सर्व बाजारपेठ बंद होती. सुरुवातीला पोलीस या प्रकरणाकडे हत्येच्या दृष्टीकोनातून तपास करत आहेत. व्यावसायिक उमेश पॅगोरिया आणि साक्षीदारांनी या घटनेची माहिती पोलिसांना दिली. पीडित कुटुंबाने याबाबत लुटमारीचीही तक्रार दिली आहे. या घटनेतील ५ दोषींचा शोध घेण्यासाठी पोलीस अथक प्रयत्न करत आहेत.

Web Title: In Agra, the wife and daughter of a businessman were murdered with intent to steal

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.