जावई होता बेरोजगार, सासऱ्यांनी पैसे देत पोलीस बनवले; त्यानंतर 'असं' काही घडलं...

By ऑनलाइन लोकमत | Published: April 13, 2023 03:12 PM2023-04-13T15:12:49+5:302023-04-13T15:14:12+5:30

चंद्रकला देवीला जेव्हा हे कळाले तेव्हा पतीसोबत तिचा वाद होऊ लागला. अनेकदा गोपाळ कुमारने पत्नीला मारहाण केली.

in Bhagalpur, Bihar, By spending money the father-in-law made his son-in-law a policeman, after which he left his wife | जावई होता बेरोजगार, सासऱ्यांनी पैसे देत पोलीस बनवले; त्यानंतर 'असं' काही घडलं...

जावई होता बेरोजगार, सासऱ्यांनी पैसे देत पोलीस बनवले; त्यानंतर 'असं' काही घडलं...

googlenewsNext

भागलपूर - बिहारच्या भागलपूर इथं अजब घटना समोर आली आहे. याठिकाणी बेरोजगार जावयाला सासऱ्याने स्वखर्चाने शिक्षण देत मोठं केले, परंतु तोच जावई पत्नी आणि मुलाला सोडून एका विवाहित महिलेच्या प्रेमात पडला. २०१३ मध्ये चंद्रकलादेवीचं गोपाळ कुमारसोबत लग्न झाले होते. गोपाळची आर्थिक परिस्थिती ठीक नसल्याने तो पत्नीसह सासरीच राहायचा. 

सासऱ्यांनी जावई स्वत:च्या पायावर उभं राहावा यासाठी पैसे देत त्यांना शिक्षण दिले. त्यानंतर जावयाला बिहार पोलीस ठाण्यात नोकरी लागली. नोकरी लागल्यानंतर गोपाळ कुमारने पत्नीला सोडून सासरी येणे-जाणे बंद केले. तो दुसऱ्या विवाहित महिलेच्या प्रेमात पडला आणि तिच्यासोबत लग्न करण्याची धमकी देऊ लागला. लग्नाच्या काही वर्ष सर्वकाही ठीक सुरू होते. परंतु अलीकडच्या काळात गोपाळ कुमारचं वीणा नावाच्या महिलेची अफेअर सुरू झाले. ड्युटीवर जाण्याच्या बहाण्याने गोपाळ वीणाला भेटायला तिच्या घरी जायचा. 

चंद्रकला देवीला जेव्हा हे कळाले तेव्हा पतीसोबत तिचा वाद होऊ लागला. अनेकदा गोपाळ कुमारने पत्नीला मारहाण केली. आता गोपाळ कुमार चंद्रकला देवीला सोडून प्रेयसी वीणासोबत लग्न करण्याचं बोलत आहे. त्यानंतर पहिल्या पत्नीने भागलपूर पोलीस ठाण्यात न्याय मागण्यासाठी तक्रार केली. सध्या हे प्रकरण कोर्टात सुरू आहे. पीडित महिलेच्या वकिलांनी कोर्टात याचिका दाखल केली आहे तसेच पोलीस त्यांचा तपास करत आहेत. चंद्रकलादेवीला ५ वर्षाची मुलगी आहे.     
 

Web Title: in Bhagalpur, Bihar, By spending money the father-in-law made his son-in-law a policeman, after which he left his wife

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.