मृताच्या नावाने अर्ज व सह्या करून युएलसी दाखला मिळवल्या प्रकरणी गुन्हा दाखल 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 18, 2022 11:26 PM2022-04-18T23:26:53+5:302022-04-18T23:26:59+5:30

भाईंदर पूर्वेच्या इंद्रलोक वसाहतीत राहणाऱ्या विकास हरेश्वर पाटील यांच्या फिर्यादी वरून गुरुवार १४ एप्रिल रोजी हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे .

In case of obtaining ULC certificate by signing the application and signing in the name of the deceased | मृताच्या नावाने अर्ज व सह्या करून युएलसी दाखला मिळवल्या प्रकरणी गुन्हा दाखल 

मृताच्या नावाने अर्ज व सह्या करून युएलसी दाखला मिळवल्या प्रकरणी गुन्हा दाखल 

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क 

मीरारोड - २००३ साली मरण पावलेल्या व्यक्तीची बनावट सही करून  युएलसी दाखला मिळवल्या प्रकरणी अखेर भाईंदर पूर्वेच्या नवघर पोलिसांनी शासनासह जमीन हिस्सेदारांची फसवणूक केल्या प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे . 

भाईंदर पूर्वेच्या इंद्रलोक वसाहतीत राहणाऱ्या विकास हरेश्वर पाटील यांच्या फिर्यादी वरून गुरुवार १४ एप्रिल रोजी हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे . फिर्यादी नुसार , पणजोबा अनंत सुकूर पाटील यांचे निधन झाल्यावर वारसा हक्काने त्यांच्या जमिनी ह्या विकास यांचे आजोबा परशुराम व चुलत आजोबा लक्ष्मण आणि विष्णू यांच्या नावे झाल्या. त्यातील लक्ष्मण पाटील यांचे २००३ सालात निधन झाले आहे . 

त्यांच्या एकूण मालमत्तां पैकी गोडदेवच्या विमल डेअरी व अभिनव शाळे जवळील दोन भूखंड बाबत ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयातून माहिती अधिकारात माहिती घेतली होती . युएलसी बाबत २००६ सालात शासन विभागा कडे अर्ज केल्याचे आढळले . त्यावर मयत लक्ष्मण पाटील सह परशुराम व विष्णू यांच्या त्या आधी प्रतिज्ञापत्र व बॉण्ड सुद्धा सापडले . त्यावर  गॅस गोदाम गल्ली , रमाबाई उद्योग, व ७, शाम भवन, बीपी रोड, भाईदर पुर्व असे पत्ते दिसून आले . माहिती अधिकारातून उघडकीस आलेल्या ह्या प्रकरणात दिलेले पत्ते हे ७११ कंस्ट्रक्शन कंपनी व संबंधित यांचे आहेत . तसेच कंपनीचे संचालक संजय सुर्वे यांचे प्रतिज्ञापत्र आदी कागदपत्रे आहेत . ह्या सर्व आधारे यूएलसी चा दाखला आदी मिळवला असल्याचे तक्रारदाराचे म्हणणे आहे . 

लक्ष्मण पाटील हे २००३ साली मयत झाले असताना त्यांच्या नावाने २००६ साली बनावट सह्या करून त्यावर दिलेला पत्ता व फायदा होणारे यांचे विरुध्द गुन्हा दाखल झाला आहे. तर पोलिसांनी आरोपीं मध्ये सध्या मयत परशुराम पाटील यांची नोंद केली असून अन्य संबंधित व लाभार्थी यांना आरोपी करण्याची मागणी तक्रारदार यांनी केली आहे . 

Web Title: In case of obtaining ULC certificate by signing the application and signing in the name of the deceased

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.