कधी थांबणार हे सारे प्रकार?; गिरगावात नराधम बापाकडून पोटच्या दोन मुलींवर अत्याचार

By ऑनलाइन लोकमत | Published: September 11, 2024 10:10 AM2024-09-11T10:10:35+5:302024-09-11T10:10:39+5:30

आईने ते अनाथालयातील महिला कर्मचारी आणि सीडब्लूसीला सांगितल्यानंतर या पिडीत मुलीचे समुपदेशन झाले

In Girgaon two girls were abused by a father | कधी थांबणार हे सारे प्रकार?; गिरगावात नराधम बापाकडून पोटच्या दोन मुलींवर अत्याचार

कधी थांबणार हे सारे प्रकार?; गिरगावात नराधम बापाकडून पोटच्या दोन मुलींवर अत्याचार

मुंबई - व्ही. पी. रोड पोलिसांनी शनिवारी एका ५२ वर्षीय व्यक्तीला पोटच्या दोन अल्पवयीन मुलींवर वारंवार बलात्कार केल्याच्या आरोपाखाली अटक केली. याप्रकरणी त्याच्या १८ वर्षीय मुलीने तक्रार केली आहे.

तक्रारदार मुलगी ही तिचे वडील, आई आणि छोट्या बहिणीसह गिरगावमध्ये राहत होती. काही महिन्यांपूर्वी एका व्यक्तीने तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्यानंतर तिला अनाथालयात पाठविण्यात आले. तिला स्वत:च्या घरात सुरक्षित वाटत नव्हते. याप्रकरणी बालकल्याण समिती (सीडब्लूसी) कडेही तक्रार करण्यात आली होती. दरम्यान मार्चमध्ये तिची आई अनाथालयात तिला भेटायला गेली, तेव्हा नराधम बाप १३ वर्षीय छोट्या मुलीला नायगावच्या चाळीत नेऊन तिच्यावर लैंगिक अत्याचार करत असल्याचे आईने सांगितले. यामुळे धक्का बसलेल्या मुलीने आपबीतीही सांगितली.

आईने ते अनाथालयातील महिला कर्मचारी आणि सीडब्लूसीला सांगितल्यानंतर या पिडीत मुलीचे समुपदेशन झाले आणि अत्याचाराचा हा प्रकार उघड झाला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार २०११ मध्ये ५ वर्षांची असल्यापासून तिचे वडील तिच्यावर लैंगिक अत्याचार करत होते. वडिलांशी वाद झाल्यानंतर आईच्या अनुपस्थितीत तो अत्याचार करायचा, तसेच जीवे मारण्याची धमकी दिल्याने या मुलीने कोणालाच काही सांगितले नाही. २०१६ पर्यंत ती या मानसिक यातना सहन करत राहिली.

प्रकरण आता व्ही. पी. रोड पोलिसांकडे
सीडब्लूसीच्या तक्रारीनंतर वर्सोवा पोलिसांनी गुन्हा नोंदवत आरोपीला शनिवारी ताब्यात घेतले. मात्र गुन्हा प्रत्यक्ष गिरगावात घडल्यामुळे ते प्रकरण व्ही. पी. रोड पोलिसांकडे वर्ग केलेे. त्यानंतर आरोपीला चार दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली. दरम्यान पिडीतेची आई व लहान बहीण घरातून निघून गेले असून, त्यांचा शोध सुरू आहे.

 

Web Title: In Girgaon two girls were abused by a father

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.