नातीनेच रचला आजोबांच्या हत्येचा कट; सुपारी देऊन फ्लाईटनं गाठलं पुणे, त्यानंतर...
By ऑनलाइन लोकमत | Published: July 25, 2024 10:40 AM2024-07-25T10:40:58+5:302024-07-25T10:44:09+5:30
संपत्ती, मालमत्तेसाठी नातीनं आजोबांना कायमचं संपवल्याची घटना उघडकीस आली आहे.
गोंडा - उत्तर प्रदेशातील गोंडा येथे खळबळजनक प्रकार समोर आला आहे. याठिकाणी संपत्तीच्या लालसेपोटी ७८ वर्षीय वृद्धाची हत्या करण्यात आली आहे. हत्येची सुपारी देऊन मुख्य आरोपी एक दिवस आधीच फ्लाईटनं पुण्याला पोहचली होती. मृत व्यक्ती रेल्वेचे निवृत्त कर्मचारी होते. पोलिसांनी या प्रकरणाचा खुलासा करत मास्टरमाईंड नातीसह ३ जणांना अटक केली आहे.
माहितीनुसार, मनकापूर परिसरातील भरेऊ गावातील ही घटना आहे. २० जुलैला गावातील ७८ वर्षीय वृद्धाची हत्या केल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानंतर पोलीस घटनास्थळी दाखल झाले त्यांनी तपासाला सुरुवात केली. या प्रकरणी गुन्हा नोंद झाला आणि तपासासाठी ३ पथके नेमण्यात आली. तपासात समोर आलेल्या माहितीतून ३ आरोपींना पोलिसांनी अटक केली. जेव्हा या तिघांची कसून चौकशी करण्यात आली तेव्हा या हत्येमागील मुख्य सूत्रधार मृत व्यक्तीची नात रिंकी चौहान होती.
तपासात तिने पोलिसांना सांगितले की, आजोबांना मारण्यासाठी सलमान आणि अखिलेशला प्लॅनमध्ये सहभागी केले. ज्यांनी ही हत्या घडवून आणली. सध्या पोलिसांनी याप्रकरणी तिघांना अटक केली असून एकाचा शोध सुरू आहे. मृत आजोबांची मालमत्ता अनेक ठिकाणी होती. रिंकी चौहानला ४ भाऊ आणि एक बहीण आहे. काही वर्षांपूर्वी रिंकी आजोबांसोबत राहत होती. जेव्हा आजीचं निधन झालं तेव्हा आजोबांसोबत नातं बिघडलं. आजोबा फार कडक होते. शिवीगाळ करायचे. आजोबांनी हळूहळू त्यांच्या संपत्तीतील काही भाग त्यांच्या नातसूनेच्या नावे केला होता. ते तिला आणखी संपत्ती देणार होते. काही वर्षापासून त्यांची सेवा नातसूनेनेच केली. आजोबांची सर्व संपत्ती तिलाच मिळेल असं वाटत होतं हे रिंकींच्या तपासातून पुढे आले.
संपत्तीच्या कारणामुळेच आजोबांना हटवण्याचं प्लॅनिंग आखलं. सलमान आणि अखिलेशला काही पैशांचे लालच दिले. त्यानंतर १९ जुलैला रात्री हत्येची तयारी केली. रिंकी स्वत: १८ जुलैला विमानानं पुण्याला निघून गेली. रिंकीने तिचा मित्र दिनेशला सांगून सलमान आणि अखिलेशला १९ जुलैच्या रात्री गावात पोहचायला सांगितले. दिनेशनं यो दाघांना रिंकींचे आजोबा बटेश्वरी चौहान यांच्या घरी पाठवलं. त्याठिकाणी या दोघांनी वृद्ध व्यक्तीचा गळा दाबला. त्यानंतर कुऱ्हाडीने गळ्यावर आणि पाठीत वार केले. सध्या या प्रकरणी पोलिसांनी मास्टरमाईंड रिंकी चौहान आणि सलमान, अखिलेश या आरोपींना अटक केली आहे.