IAS अधिकाऱ्याच्या पत्नीचे गँगस्टरशी विवाह्यबाह्य संबंध; विष पिऊन पत्नीची आत्महत्या
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 22, 2024 09:45 IST2024-07-22T09:44:36+5:302024-07-22T09:45:07+5:30
गुजरातमध्ये एका IAS अधिकाऱ्याच्या पत्नीने विष पिऊन आत्महत्या केल्यानं खळबळ माजली आहे. सध्या या प्रकरणाचा पोलीस तपास करत आहेत.

IAS अधिकाऱ्याच्या पत्नीचे गँगस्टरशी विवाह्यबाह्य संबंध; विष पिऊन पत्नीची आत्महत्या
अहमदाबाद - गुजरातच्या एका ज्येष्ठ आयएएस अधिकाऱ्याच्या पत्नीनं शनिवारी विष प्यायलं. त्यानंतर गंभीर अवस्थेत त्यांना गांधीनगर रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. रविवारी उपचारावेळी त्यांचा मृत्यू झाला. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपासाला सुरुवात केली. यावेळी तपासात अनेक धक्कादायक खुलासे बाहेर आले आहेत.
माहितीनुसार, IAS अधिकारी आणि त्यांची पत्नी गेल्या अनेक महिन्यांपासून वेगळे राहत होते. अधिकाऱ्याची पत्नी तामिळनाडूत राहणारी होती जी एका गँगस्टर हायकोर्ट महाराजाच्या संबंधात आली. इतकेच नाही तर तामिळनाडूत १४ वर्षीय मुलाच्या अपहरणात तिचं नाव आलं होतं. गँगस्टरनं त्याचा साथीदार सँथिल कुमारसह ११ जुलैला मुलाचं अपहरण केले होते. मुलाच्या सुटकेसाठी २ कोटीची खंडणी मागितली. पोलिसांनी या मुलाची सुटका केली तेव्हापासून पोलीस आयएएस पत्नी सूर्याचा शोध घेत होती.
जवळपास ९ महिन्यापूर्वी सूर्याने आयएएस पतीला सोडलं होतं. ती गँगस्टरच्या प्रेमात होती. ८ महिन्यापासून ती गुजरातला नव्हती. अधिकाऱ्याने पत्नीला घटस्फोट देण्याचं ठरवलं होतं. तेव्हा पत्नी पतीच्या घरी आली तेव्हा तिला घरात घुसण्यापासून रोखण्यात आलं. त्यानंतर महिलेनं विष प्यायलं, गांधीनगरच्या रुग्णालयात उपचारावेळी तिचा मृत्यू झाला. आत्महत्येपूर्वी पत्नी सूर्याने पत्र लिहिलं होतं. सूर्याबेनच्या मृत्यूची बातमी पोलिसांनी तिच्या कुटुंबाला दिली.
आत्महत्येपूर्वी सूर्याबेननं एक पत्र लिहिलं होतं. त्यात तिने तामिळनाडूत झालेल्या विश्वासघाताचा उल्लेख केला होता. त्यांना नवीन आयुष्य सुरू करायचं होतं परंतु काहीठिकाणी त्यांचे पैसे अडकले होते जे परत मिळण्याची शक्यता नव्हती. पतीकडेही ती जाऊ शकत नव्हती. पत्रात महिलेने पतीविरोधात कुठलेही आरोप लावले नाहीत. ज्येष्ठ आयएएस अधिकारी रंजीत कुमार २००५ चे बॅचचे अधिकारी आहेत. ते सध्या गुजरात विद्युत नियामक आयोगाच्या सचिव पदावर कार्यरत आहेत. दिर्घकाळापासून हे दोघे पती-पत्नी विभक्त राहत होते.