कल्याणमध्ये शेजाऱ्यांनीच मारला घरावर डल्ला; दुसऱ्यांदा चोरी करणं पडलं महागात

By ऑनलाइन लोकमत | Published: December 27, 2022 07:31 PM2022-12-27T19:31:39+5:302022-12-27T19:31:59+5:30

Crime News : सध्या पोलिसांनी रियाजला ताब्यात घेत अजून किती गुन्हे केले, याचा तपास सुरू केला आहे. 

In Kalyan, it was the neighbors who beat the house; Stealing the second time was expensive | कल्याणमध्ये शेजाऱ्यांनीच मारला घरावर डल्ला; दुसऱ्यांदा चोरी करणं पडलं महागात

कल्याणमध्ये शेजाऱ्यांनीच मारला घरावर डल्ला; दुसऱ्यांदा चोरी करणं पडलं महागात

googlenewsNext

कल्याण : शेजाऱ्यांनीच घरात चोरी केल्याची घटना कल्याणमध्ये घडली आहे. फारुख शेख (वय 55) हे कल्याण पश्चिमेत मेमन मश्चिद परिसरात गुलजार टांगेवाली चाळ परिसरात राहतात. त्यांचे कल्याणमध्येच शोरुम असून त्यांच्या घरासमोरच आरोपी रियाज शेख हा राहण्यास आहे. तो रिक्षा चालवण्याचा व्यवसाय करतो. रियाज याची पत्नी ही गरोदर असताना व बहीण आजारी असताना त्यांच्या उपचारासाठी लाखो रुपयांचा खर्च आला होता. हा खर्च भरुन काढण्यासाठी रियाजने चोरीचा मार्ग पत्करला. 

ऑगस्ट महिन्यात फारुख यांच्या घराचे कुलूप तोडत रियाजने घरातील 8 तोळे सोने व रोकड चोरली होती. त्यानंतर 20 डिसेंबरला पहाटे फारुख हे त्यांच्या नातेवाईकांचे निधन झाल्याने घराबाहेर गेले होते. याचा फायदा घेत रियाजने त्यांच्या घरातील 17 लाखाची रोकड चोरली. याप्रकरणी बाजारपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. एकाच घरात दोनदा चोरी झाल्याने वरिष्ठ पोलिस निरिक्षक नरेंद्र पवार व गुन्हे पोलीस निरिक्षक पवार यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलिस निरिक्षक ए.जी.घोलप, पोलिस उपनिरिक्षक अजिंक्य मोरे, पोलिस हवालदार टी. पावशे, बी. बागुल, पी. बाविस्कर, सी. कातकडे यांच्या पथकाने तपासास सुरुवात केली. 

शेजारीच राहणाऱ्या व्यक्तींचे हे काम असल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांना होता. त्यानुसार माहिती काढली असता गुप्त बातमीदाराने एक व्यक्ती फारुख यांच्या घरी गेल्याचे सांगितले. त्यानुसार तपास करत पोलिसांनी अवघ्या काही तासातच आरोपी रियाजला ताब्यात घेतले. सुरुवातीला त्याने आपण रिक्षा चालवत असून त्यावेळी त्या परिसरात नसल्याचे सांगितले. परंतू पोलिसांनी खाक्या दाखवताच रियाजने एकूण 3 गुन्ह्यांची कबुली देत 5 हजाराची रोख रक्कम व 9 तोळे सोने असा एकूण 2 लाख 6 हजाराचा माल सुद्धा दिला. सध्या पोलिसांनी रियाजला ताब्यात घेत अजून किती गुन्हे केले, याचा तपास सुरू केला आहे. 
 

Web Title: In Kalyan, it was the neighbors who beat the house; Stealing the second time was expensive

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.