पत्नीला व्हिडिओ कॉल करून पतीनं उचललं टोकाचं पाऊल; खोलीतील दृश्य पाहून आई वडील हादरले
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 4, 2025 10:21 IST2025-04-04T10:21:04+5:302025-04-04T10:21:42+5:30
मागील ८ महिन्यापासून ते तिथे राहत होते. नुकतेच या दोघांमध्ये वाद झाले आणि राधा दिनेशला सोडून माहेरी राहू लागली.

पत्नीला व्हिडिओ कॉल करून पतीनं उचललं टोकाचं पाऊल; खोलीतील दृश्य पाहून आई वडील हादरले
कानपूर - अलीकडच्या काळात पती-पत्नी यांच्यातील वादाच्या घटना सातत्याने पुढे येत आहेत. त्यात काही घटनेत या नात्याचा भयंकर शेवटही पाहायला मिळत आहे. कुठे हत्या तर कुठे आत्महत्यासारखे प्रकार घडत आहेत. उत्तर प्रदेशातील कानपूर येथे अशीच घटना समोर आली आहे. जिथे एका युवकाने त्याच्या पत्नीला व्हिडिओ कॉल करून टोकाचं पाऊल उचललं आहे.
माहितीनुसार, लग्नानंतर पती-पत्नी यांच्यात कायम वाद होत होता. पत्नी तिच्या माहेरी निघून गेली. पती तिला पुन्हा घरी येण्यासाठी विनवणी करत होता परंतु तिने ऐकलं नाही. पत्नीला सांगूनही ती ऐकत नसल्याने मानसिक तणाव आणि रागाच्या भरात पतीने कैचीनं स्वत:चा गळ्यावर वार केले त्यानंतर पोट, छातीवर वार करत राहिला. या घटनेत पतीचा मृत्यू झाला आहे तर सुनेने २ एप्रिलला फोन करून धमकी दिली होती. तुम्ही तुमच्या मुलाचा चेहरा पाहू शकणार नाही असा आरोप मृतक युवकाच्या वडिलांनी केला आहे.
२६ वर्षीय दिनेश उर्फ अजय बजरंगी जो शिलाईचं काम करायचा. हनुमंत विहार येथे तो तिच्या कुटुंबासह राहत होता. त्याचे २२ जून २०२३ फतेहपूरच्या राधासोबत झालं. लग्नानंतर काही दिवसांत दोघांमध्ये मतभेद तयार झाले. राधा वेगळं राहण्याची मागणी करू लागली तेव्हा दिनेशने बारादेवी येथे भाड्याने खोली घेतली. मागील ८ महिन्यापासून ते तिथे राहत होते. नुकतेच या दोघांमध्ये वाद झाले आणि राधा दिनेशला सोडून माहेरी राहू लागली.
सुन करायची मुलाचा छळ
माझा मुलगा मानसिकदृष्ट्या खचला होता. त्याची पत्नी त्याला मारहाण करायची असा आरोप मृत युवकाच्या आईने केला. तुमच्या मुलाला भेटायचे तर आताच भेटा, कारण लवकरच त्याला जेलमध्ये पाठवणार आहे. त्याचा चेहराही तुम्हाला बघायला मिळणार नाही अशी धमकी सुनेने सासऱ्याला दिली होती.
वारंवार वाद आणि पत्नीच्या धमक्यांना कंटाळून अखेर युवकाने पत्नीला व्हिडिओ कॉल करून कैची आणि चाकूने स्वत:च्या शरीरावर वार करून घेतले. पत्नी हे पाहून जोरजोरात ओरडू लागली, तो आवाज ऐकून कुटुंबातील धावत आले. परंतु तोपर्यंत युवक रक्ताच्या थारोळ्यात बेशुद्ध पडला होता. त्याला तातडीने हॉस्पिटलला नेण्यात आले. तिथे डॉक्टरांनी तपासून त्याला मृत घोषित केले. सध्या या प्रकरणाची चौकशी पोलीस करत आहेत.