कसारा घाटात कंटेनर गेला खोल दरीत, एक गंभीर जखमी

By ऑनलाइन लोकमत | Published: March 16, 2022 04:50 PM2022-03-16T16:50:53+5:302022-03-16T16:53:52+5:30

Accident Case :मुंबई सोयाबीन घेऊन जाणारा कंटेनर कसारा घाटातून जात असताना रेल्वे हिवाळा ब्रिज पॉईंटच्या अगोदर असलेल्या वळणावर कटेनर चालकाचा गाडीवरील ताबा सुटला व कंटेनर थेट खोल दरीत कोसळला.

In Kasara Ghat the container went deep into the valley, seriously injuring one | कसारा घाटात कंटेनर गेला खोल दरीत, एक गंभीर जखमी

कसारा घाटात कंटेनर गेला खोल दरीत, एक गंभीर जखमी

googlenewsNext

शाम धुमाळ

कसारा  - मुंबई नाशिक महामार्गावरील कसारा घाटात कंटेनर क्रमांक एम एच 46 ए आर 4421 (MH-46 AR-4421) 200 फूट खोल दरीत जाऊन गाडीचा चालक गंभीररित्या जखमी झाला. मुंबई सोयाबीन घेऊन जाणारा कंटेनर कसारा घाटातून जात असताना रेल्वे हिवाळा ब्रिज पॉईंटच्या अगोदर असलेल्या वळणावर कटेनर चालकाचा गाडीवरील ताबा सुटला व कंटेनर थेट खोल दरीत कोसळला.

या भीषण अपघातात  कंटेनर चा मोठ्या प्रमाणात चुराडा होऊन कंटेनरमधील सोयाबीनच्या गोण्या दरीत अस्तव्यस्त पडल्या होत्या. दरम्यान कंटेनरचे चालक (नाव समजु शकले नाही) ह्याने दरीत गाडी पडते वेळी गाडीतून उडी घेतल्याने तो बचावला असून त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने त्याला महामार्ग पोलीस घोटी केंद्र व आपत्ती व्यवस्थापन टीमच्या मदतीने 108 रुग्णवाहिकेने इगतपुरी ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. दरम्यान प्रकृती गंभीर असल्याने चालकास नाशिक सिव्हिल रुग्णालयात पाठवण्यात आले. या प्रकरणी कसारा पोलीस ठाण्यात अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास कसारा पोलीस करीत आहेत.

पोलिसांचा पहारा

दरम्यान दरीत गेलेला कंटेनर मधील सोयाबीन चोरी जाऊ नये किंवा अन्य दुर्घटना घडू नये यासाठी भर उन्हात पोलिसांनी बंदोबस्त ठेवला. दरम्यान खोल दरीतील कंटेनर आणि सोयाबीनच्या गोण्यावर वाढ, शर्थीचे प्रयत्न करावे लागणार असल्याचे पोलीस सूत्रांकडून सांगण्यात येते.

निष्कृष्ट संरक्षक कठडे आणखी किती बळी घेणार

दरम्यान जुन्या कसारा घाटात आजवर कठडा तोडून अनेक अपघात झालेत अपघातग्रस्त वाहन थेट दरीत जात आहेत. खोल दरीच्या बाजूने किमान मजबूत व लोखडी  संरक्षक कठडा असणे गरजेचे आहे. परंतु संबंधित राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण व टोल यंत्रणेने घाटात दरीच्या बाजूने संरक्षक कठड्याकडे कानाडोळाकरीत निष्कृष्ट दर्जाचे संरक्षक कठडा तयार करीत आहेत. परिणामी दुचाकीच्या धडकेत देखील हे कठडा तुटत आहेत.

Web Title: In Kasara Ghat the container went deep into the valley, seriously injuring one

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.