धक्कादायक! "तू आमच्यासाेबत दारु का घेतली नाही" म्हणत चाैघांकडून चाकू हल्ला

By राजकुमार जोंधळे | Published: June 12, 2023 11:35 PM2023-06-12T23:35:48+5:302023-06-12T23:37:53+5:30

लातूर जिल्ह्यातील घटना : एकाला अटक तर तीन जण फरार

In Latur Knife attack by guys saying no why did you take liquor with us | धक्कादायक! "तू आमच्यासाेबत दारु का घेतली नाही" म्हणत चाैघांकडून चाकू हल्ला

धक्कादायक! "तू आमच्यासाेबत दारु का घेतली नाही" म्हणत चाैघांकडून चाकू हल्ला

googlenewsNext

शिरूर अनंतपाळ (जि. लातूर) : तालुक्यातील साकोळ येथील एका युवकाला तू आमच्या सोबत दारू का पिला नाहीस? असे म्हणून चौघांनी संगनमत करत चाकू हल्ला केला. या हल्ल्यात ताे युवक गंभीर जखमी झाल्याची घटना घडली. याबाबत शिरूर अनंतपाळ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. यातील एकाला पाेलिसांनी अटक करुन साेमवारी न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने चार दिवसांची पाेलिस काेठडी सुनावली आहे. 

पोलिसांनी सांगितले, शिरुर अनंतपाळ तालुक्यातील साकोळ येथील सोनू माळी, फेरोज शेख, चंदू माने, सोहेल शेख या चौघांनी संगनमत केले. तुकाराम सूर्यवंशी याला जातिवाचक शिवीगाळ करून लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. त्याचबराेबर जिवे मारण्याच्या उद्देशाने चाकूचे वार करत गंभीर जखमी केले. जखमी झालेल्या तुकाराम सूर्यवंशीवर लातूर येथील शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. याबाबत तुकाराम सूर्यवंशी यांच्या तक्रारीवरून शिरूर अनंतपाळ पोलिस ठाण्यात कलम ३०७, ३२४, ३२३, ५०४, ३४ भादवि ३ (२)(व), अनुसूचित जाती-जमाती प्रतिबंधक कायद्यान्वये चौघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. यातील चंदू माने याला पाेलिसांनी अटक केली असून, अन्य तिघे फरार आहेत. तपास सहायक पोलिस उपाधीक्षक निकेतन कदम यांच्या मार्गदर्शनाखाली शिरुर अनंतपाळ ठाण्याचे पोलिस करत आहेत.

आराेपीला चार दिवसांची पोलिस कोठडी...
अटक करण्यात आलेला आरोपी चंदू माने याला सोमवारी न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने त्याला चार दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे, अशी  माहिती सहायक पाेलिस निरीक्षक प्रवीण राठोड यांनी दिली.

Web Title: In Latur Knife attack by guys saying no why did you take liquor with us

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.