लाेकलमध्ये चाेरीच्या संशयावरून दाेघांना चाेप देत केले अर्धनग्न, व्हिडीओ व्हायरल

By मुरलीधर भवार | Published: February 7, 2023 02:49 PM2023-02-07T14:49:18+5:302023-02-07T16:51:39+5:30

Crime New: मुंबई छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते बदलापूर ही लाेकल गाडी आहे. या लाेकल गाडीत काेपर ते डाेंबिवली रेल्वे स्थानका दरम्यान दाेन जणांनी चाेरी केल्याच्या संशय़ावरुन प्रवाशांनी त्यांना मारहाण केली.

In Local Train two were beaten half-naked on suspicion of cheating, the video went viral | लाेकलमध्ये चाेरीच्या संशयावरून दाेघांना चाेप देत केले अर्धनग्न, व्हिडीओ व्हायरल

लाेकलमध्ये चाेरीच्या संशयावरून दाेघांना चाेप देत केले अर्धनग्न, व्हिडीओ व्हायरल

googlenewsNext

- मुरलीधर भवार

कल्याण - रेल्वे लाेकल गाडीत चाेरी केल्याच्या संशयावरुन दाेन जणांना प्रवाशांनी चांगलात चाेप दिला आहे. त्यांना चांगलीच अद्दल घडविण्यासाठी प्रवाशांनी त्या दाेघांना अर्धनग्न केले हाेते. या घटनेचा व्हीडीआे साेशल मिडियावर व्हायरल झाला आहे. ही घटना काेपर ते डाेंबिवली रेल्वे स्थानका दरम्यान घडल्याचे दिसून येत आहे.

मुंबई छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते बदलापूर ही लाेकल गाडी आहे. या लाेकल गाडीत काेपर ते डाेंबिवली रेल्वे स्थानका दरम्यान दाेन जणांनी चाेरी केल्याच्या संशय़ावरुन प्रवाशांनी त्यांना मारहाण केली. त्यांना चांगलाच चाेप दिल्यावर त्यांची झडती घेण्याचा प्रयत्न केला. त्याला त्या दाेघांनी मज्जाव केला असता प्रवाशांनी त्या  दाेघांना अर्धनग्न केले. हा सगळा प्रकार भर गर्दीत हाेत असतान गाडीतील इंडिकेटरवर काेपर या स्टेशनाचा उल्लेख दिसून येत आहे. त्यामुळे हा प्रकार काेपर ते डाेंबिवली रेल्वे स्थानका दरम्यान घडला असल्याचे स्पष्ट हाेत आहे. ही गाडी बदलापूर हाेती. या घटनेचा व्हीडीआे साेशल मिडियावर व्हायरल झाला आहे.

हा व्हायरल व्हिडीओ रेल्वे पाेलिसांच्या हाती देखील आला आहे. मात्र ही घटना नेमकी कधी घडली आहे. याचा शाेध पाेलिसांनी घेतत्यावरच ही बाब उघड हाेणार आहे. पाेलिसांनी या घटनेचा तपास सुरु केला आहे. प्रवाशांनी चाेरीच्या संशय़ावरुन केलेली मारहाण कितीपत खरी आहे. याचाही पाेलिस शाेध घेणार आहे.

Web Title: In Local Train two were beaten half-naked on suspicion of cheating, the video went viral

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.