मुलुंडमध्ये पेयातून गुंगीचे औषध देत मुलीवर लैंगिक अत्याचार दोघांविरुद्ध गुन्हा, एकाला अटक

By मनीषा म्हात्रे | Published: September 25, 2023 03:34 PM2023-09-25T15:34:19+5:302023-09-25T15:34:38+5:30

मुलुंड परिसरात १५ वर्षीय मुलगी कुटुंबीयांसोबत राहते. याप्रकरणी मुलुंड पोलिसांनी निलेश पुवज हरीजन (२१) याला अटक केली आहे.

In Mulund, a case has been filed against two for sexually assaulting a girl by giving gungi medicine through drink, one arrested | मुलुंडमध्ये पेयातून गुंगीचे औषध देत मुलीवर लैंगिक अत्याचार दोघांविरुद्ध गुन्हा, एकाला अटक

मुलुंडमध्ये पेयातून गुंगीचे औषध देत मुलीवर लैंगिक अत्याचार दोघांविरुद्ध गुन्हा, एकाला अटक

googlenewsNext

मुंबई : पेयातून गुंगीचे औषध देत, १५ वर्षीय मुलीवर दोघांनी लैंगिक अत्याचार केल्याची घटना मुलुंडमध्ये समोर आली आहे. याप्रकरणी मुलुंड पोलिसांनी लैंगिक अत्याचार, पोक्सो अंतर्गत रविवारी रात्री उशिराने गुन्हा नोंदवत एकाला अटक केली आहे. 

मुलुंड परिसरात १५ वर्षीय मुलगी कुटुंबीयांसोबत राहते. याप्रकरणी मुलुंड पोलिसांनी निलेश पुवज हरीजन (२१) याला अटक केली आहे. तर अन्य साथीदार नटराजन हरीजन (३७) याचा शोध सुरू आहे. तो सध्या तमिळनाडू येथे असल्याची माहिती समोर येत आहे.

मुलीने निलेशकडे पैशांची मागणी केली. त्याने मुलीला घरात घेतले. यावेळी मित्र नटराजनही घरात होता. निलेशने पैसे दिले नाही. मुलीला पेयातून गुंगीचे औषध दिले. तिला जबरदस्तीने दारुही पाजली. त्यानंतर तिच्यावर लैंगिक अत्याचार केले. याबाबत कुणालाही काही सांगितल्यास  आईला जिवे ठार मारण्याची धमकी दिली. त्यानंतर, 

चार ते पाच दिवसांच्या अंतराने निलेश याच्या घरी नेउन निलेश व नटराज यांनी धमकाहून तिच्यावर अत्याचार सुरूच ठेवले. अखेर, अत्याचार वाढल्याने मुलीने रात्री उशिराने मुलुंड पोलीस ठाणे गाठून तक्रार दिली. त्यानुसार, पोलिसांनी पोक्सो, लैंगिक अत्याचार कायद्या अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.  

 

Web Title: In Mulund, a case has been filed against two for sexually assaulting a girl by giving gungi medicine through drink, one arrested

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.