शाळेच्या गेटवरील मैत्री विद्यार्थिनीला पडली महागात; सोन्याचे दागिने लुटले
By ऑनलाइन लोकमत | Published: December 5, 2022 08:49 AM2022-12-05T08:49:31+5:302022-12-05T08:50:00+5:30
न्यूड फोटो व्हायरल करण्याची धमकी, मुंबई सेंट्रल परिसरात राहणाऱ्या एका उच्चभ्रू घरातील १२ वर्षीय मुलीच्या बाबतीत ही घटना घडली आहे.
मनीषा म्हात्रे
मुंबई : वडाळ्यातील पालिका शाळेत विद्यार्थिनीवर करण्यात आलेल्या बलात्काराची घटना ताजी असतानाच, शाळेच्या गेटवरील मैत्रीमुळे विद्यार्थिनीला स्वतःचा खिसा रिकामा करत घरात चोरी करण्याची वेळ आल्याची धक्कादायक घटना नागपाड्यात घडली आहे. याप्रकरणी नागपाडा पोलिस अधिक तपास करत आहेत.
मुंबई सेंट्रल परिसरात राहणाऱ्या एका उच्चभ्रू घरातील १२ वर्षीय मुलीच्या बाबतीत ही घटना घडली आहे. भायखळा येथील एका इंग्रजी माध्यमाच्या शाळेत ती शिकते. २०१९ मध्ये शाळेच्या गेटवर भेटणाऱ्या अमन नावाच्या तरुणाशी तिची ओळख झाली. ओळखीतून अमनने तिला एका रूममध्ये नेत नग्न केले. त्याचे व्हिडीओ काढून तिच्यावर लैंगिक अत्याचार केले. पुढे, रूममध्येच कोंडून व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देत तिच्याकडून तीन लाख रुपये उकळले.
पाठलाग... अन् बेल्टने मारहाण
कुलाबा परिसरात राहणारी १७ वर्षीय विद्यार्थिनी परीक्षा देऊन शाळेच्या गेटमधून बाहेर पडत असताना आर्मी मार्केटकडून एकाने पाठलाग करत तिचा हात पकडून अश्लील चाळे केले. तसेच, तिच्या मदतीसाठी धावलेल्या मित्रमैत्रिणींना बेल्टने तसेच लाथाबुक्क्यांनी मारहाण केल्याची धक्कादायक घटना शनिवारी केंद्रीय महाविद्यालयाबाहेर घडली. याप्रकरणी कफ परेड पोलिसांनी गणेश अंजिनिया राव (२०) याला अटक केली आहे.
स्वत:च्याच घरात चोरी
त्यानंतर, वेळोवेळी पैसे, दागिन्यांची मागणी करत धमकावले. भीतीने तिने आणखीन दोन लाख, गळ्यातील डायमंड सेट, कमरफूल, डायमंडच्या बांगड्या, सोन्याचे बिस्कीटचे लॉकेट, एक डायमंड रिंग, एक सोन्याची चेन, एक सोन्याचा नेकलेस चोरी करून त्याला दिला.
घरातील पैसे, दागिने गायब होत असल्याने कुटुंबीयांना संशय आला. तसेच, मुलीच्याही वागण्यात बदल जाणवल्याने आईने मुलीला विश्वासात घेत चौकशी केली. तेव्हा, तिने अमनच्या अत्याचाराला वाचा फोडली. आईने तत्काळ पोलिसांत धाव घेत तक्रार दिली. त्यानुसार, पोलिसांनी अपहरण, खंडणी, पोक्सो, लैंगिक अत्याचार प्रकरणी गुन्हा नोंदवत ते अधिक तपास करत आहेत.
मुलीकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे आरोपीचा शोध सुरू आहे. याप्रकरणात अद्याप कुणालाही अटक करण्यात आलेली नाही. - महेशकुमार ठाकूर, वरिष्ठ पोलिस निरीक्षक, नागपाडा पोलिस ठाणे