लैंगिक अत्याचार करणाऱ्या सावत्र बापावर मुलीने केला हल्ला; चाकूने गुप्तांग कापले

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 24, 2025 17:54 IST2025-03-24T17:52:58+5:302025-03-24T17:54:01+5:30

हातात चाकू घेऊन फिरत असलेला या तरुणीचा व्हिडिओ देखील स्थानिकांनी काढला आहे.

In Nalasopara- Daughter attacks stepfather who sexually abused her; cuts off his genitals with a knife | लैंगिक अत्याचार करणाऱ्या सावत्र बापावर मुलीने केला हल्ला; चाकूने गुप्तांग कापले

लैंगिक अत्याचार करणाऱ्या सावत्र बापावर मुलीने केला हल्ला; चाकूने गुप्तांग कापले

मंगेश कराळे

नालासोपारा - संतोष भवनच्या बावशेत पाडा येथील एका चाळीत सोमवारी दुपारच्या सुमारास धक्कादायक आणि विचित्र घटना घडली आहे. सावत्र वडिलांकडून होणार्‍या लैंगिक अत्याचाराला कंटाळून एका २४ वर्षीय तरुणीने वडिलांवर चाकूने हल्ला करत गुप्तांग कापून टाकले आहे. या हल्ल्यात मुलीचे वडील गंभीर जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी मुंबईच्या शताब्दी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. 

२४ वर्षीय तरुणी नालासोपाराच्या संतोषभुवन येथील एका चाळीत राहते. तुळींज पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार तिच्या आईने दुसरे लग्न केले होते. तिचे सावत्र वडील रमेश भारती हे मागील दोन वर्षांपासून तिच्यावर लैंगिक अत्याचार करत होते. सोमवारी देखील त्यांनी तिच्यावर शरीरसंबंध बनविण्यासाठी दबाव टाकला होता. त्यानंतर तिने हल्ल्याची योजना बनवली. हे करण्यासाठी लाज वाटते असे सांगून तिने तिच्या वडिलांच्या डोळ्यावर पट्टी बांधली. मग अचानक हल्ला केला आणि गुप्तांग कापून टाकले. रक्तबंबाळ अवस्थेत रमेश भारती घराबाहेर गेले. तेव्हा तिने रस्त्यात गाठून त्याच्यावर सपासप वार केले. माझ्यावर लैंगिक अत्याचार करत असल्याने मी हल्ला केला असे तिने लोकांना सांगितले. हातात चाकू घेऊन फिरत असलेला या तरुणीचा व्हिडिओ देखील स्थानिकांनी काढला आहे. तुळींज पोलिसांनी त्या तरुणीला ताब्यात घेतले असून पुढील तपास करत आहे.

Web Title: In Nalasopara- Daughter attacks stepfather who sexually abused her; cuts off his genitals with a knife

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.