हृदयद्रावक! नालासोपाऱ्यात वडिलांनी मुलासह घेतली लोकलसमोर उडी, मुलाचा मृत्यू, वडील गंभीर जखमी
By ऑनलाइन लोकमत | Published: March 6, 2022 06:44 PM2022-03-06T18:44:43+5:302022-03-06T18:45:32+5:30
Crime News: वसई रोड आणि नालासोपारा रेल्वे ट्रॅक दरम्यान नालासोपारा पूर्वेस राहणाऱ्या एका बापाने चक्क आपल्या तीन वर्षीय चिमुरड्याला जोडीला घेऊन लोकल ट्रेन येताच त्याखाली उडी मारून आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना रविवार दि ६ मार्च रोजीच्या पहाटे घडली आहे.
वसई - वसई रोड आणि नालासोपारा रेल्वे ट्रॅक दरम्यान नालासोपारा पूर्वेस राहणाऱ्या एका बापाने चक्क आपल्या तीन वर्षीय चिमुरड्याला जोडीला घेऊन लोकल ट्रेन येताच त्याखाली उडी मारून आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना रविवार दि ६ मार्च रोजीच्या पहाटे घडली आहे. या रेल्वे अपघात प्रकरणात तीन वर्षे चिमुरड्या चा जागीच मृत्यू झाला असून त्याच्या पित्याची प्रकृती चिंताजनक आहे.
अधिक माहितीनुसार, रविवार दि ६ मार्च रोजी पहाटे वसई रोड नालासोपारा रेल्वे स्टेशन दरम्यान विरार हुन सुटणारी ५ वाजून ११ मिनिटांची विरार चर्चगेट लोकल ट्रेन येताच त्याखाली पिता राजु वाघेला (३०) आणि मुलगा कृष्णा वाघेला (३) या दोघांनी उडी घेतली असता कृष्णा चा जागी च मृत्यु झाला तर पिता राजू हा गंभीर जखमी झाल्यानं त्याला तात्काळ नालासोपारा येथील खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे मात्र त्याची प्रकृती चिंताजनक आहे.
दरम्यान, पित्याने आपल्या अवघ्या तीन वर्षांच्या मुलाला सोबत घेऊन का बरं आत्महत्या केली याचं नेमकं कारण स्पष्ट होऊ शकलं नाही. मात्र यदाकदाचित कौटुंबिक कारणामुळे आत्महत्या करावी लागली असावी असा प्राथमिक अंदाज रेल्वे पोलिसांनी वर्तवला आहे. कृष्णाच्या खेळण्या बागडण्याच्या दिवसांत पित्यासोबत कृष्णाला आत्महत्या करावी लागली, यासाठी नेमकं कोणतं कारण असू शकेल याचा तपास होणं आवश्यक आहे. रविवारी पहाटे घडलेल्या या आत्महत्या प्रकराने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे